Video : अभिजीत दिपके अन् PM मोदींची अमेरिकेत भेट?; राऊतांचा मोठ्या गौप्यस्फोटाने खळबळ

अभिजीत दिपके आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेत भेट झाल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे

Letsupp Image   2026 06 11T110526.608

Letsupp Image 2026 06 11T110526.608

Abhijeet Dipke Meets PM Modi In US : कॉक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेत भेट झाल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊतांच्या या दाव्यानंतर खळबळ उडाली असून, दोघांच्या भेटीचे फोटो एका व्यक्तीने मला पाठवल्याचे राऊतांनी म्हटले आहे. मोदींच्या भेटीनंतर दिपके भारतात आल्याचेही लोकं म्हणतात असे राऊत यांनी म्हटले आहे. याबाबत मी माहिती घेत असल्याचेही राऊतांनी सांगितलं. यावेळी त्यांनी मोदी सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

फॉलोअर्सच्या संख्येतील चढ-उतार संशयास्पद; Cockroach Janta Party च्या इंस्टाग्राम खात्याविरोधात तक्रार

मोदींच्या भेटीनंतरचं दीपके भारतात

अभिजीत दिपके आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेतील कथित भेटीवरूनही राऊतांनी सूचक वक्तव्य केले. “दिपके आणि मोदींची भेट झाल्याचे फोटो आमच्याकडे आले आहेत. त्यानंतर दिपके भारतात परतले, अशी माहिती मिळाली आहे. आम्ही तरुणांच्या आंदोलनाला आणि त्यांच्या प्रश्नांना पाठिंबा दिला आहे, परंतु या आंदोलनाच्या माध्यमातून जर सरकारला मदत होत असेल, तर त्यावर आमचे लक्ष आहे. आम्ही आगीत उड्या मारणार नाही, पण या प्रकरणाची खातरजमा करून माहिती घेतली जाईल,” असे राऊत यांनी स्पष्ट केले.

तो फोटो AI जनरेटेड असेल

राऊतांनी केलेल्या या दाव्यानंतर अभिजीत दिपके यांनी टीव्ही9 या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, तो फोटो मी अद्यापपर्यंत पाहिलेला नाही. तसेच माझी अशाप्रकारे कोणतीही भेट झालेली नसून भेटीचा फोटो AI जनरेडेट असावा असे दीपके यांनी म्हटले आहे.

पुण्यात आज CJP चं आंदोलन 

काही दिवसांपूर्वी भारतात परतल्यानंतर दिपके यांनी दिल्लीतील जंतर-मंतरवर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन केले होते. त्यानंतर आज (दि.11) CJP कडून पुण्यात आंदोलन केले जात आहे. त्याआधी काल (दि.10) दिपके यांनी पत्रकार परिषद घेतली होती. ज्यात त्यांनी येत्या 20 जून रोजी दिल्लीत आणखी मोठे आंदोलन केले जाईल, अशी घोषणा केली. आम्ही सध्या पुण्यात आंदोलन करत आहोत. आमच्यासोबत पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत, एमपीएससी, यूपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी आहेत. आता लवकरच आम्ही या आंदोलनाबाबत सविस्तर माहिती देऊ, असे अभिजित दिपके यांनी सांगितले.

मी एकटा बोलत असेल तर ते माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतील. परंतु लाखो, करोडो मुलं बोलतील तर कोणाचा आवाज दाबण्याची त्यांची हिंमत होणार नाही. तुरुंगात कोणाला जायचंच असेल तर मी जाईल. मी तुमच्या मुलांना तुरुंगात जाऊ देणार नाही. त्याची जबाबदारी मी घेतो. परंतु, तुमच्या मुलांना बोलण्यापासून रोखू नका, असं आवाहन अभिजित दीपके यांनी केलं. तसंच, पुण्यातील आंदोलन हे जंतर-मंतरपेक्षा मोठं असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.

CJP नंतर आता राजकारणात ‘इश्क’चा तडका; माजी न्यायमूर्ती काटजूंकडून ‘इश्क करो पार्टी’ ची घोषणा

मोदी सरकारवर संजय राऊतांचा घणाघाती हल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अत्यंत गंभीर आरोप करत जोरदार टीका केली आहे. २०१४ पासून देश एका दुष्टचक्रात अडकला असून, आता या नव्या ‘घाशीराम कोतवाल’ प्रवृत्तीच्या विरोधात पुन्हा एकदा लढा उभारण्याची वेळ आली आहे, असे विधान राऊत यांनी केले आहे.

पक्ष फोडणे हेच मोदींचे राजकारण’

संजय राऊत म्हणाले, “मोदींनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससारखे पक्ष फोडले, हे कृत्य कपट आणि कारस्थानाचे नाही का? त्यांनी ज्या ‘भ्रष्ट’ आणि ‘कपटी’ लोकांवर टीका केली, त्याच लोकांना आज आपल्या पक्षात सामील करून घेतले आहे. २०१४ ते २०१९ हाच मोदींचा खरा कार्यकाळ होता, त्यानंतर त्यांनी केवळ चोरलेल्या लोकांच्या मदतीने आणि संस्थांचा गैरवापर करून सत्ता टिकवून ठेवली आहे. निवडणूक यंत्रणा आणि प्रशासनात घोटाळा करूनच ते विजय मिळवत आहेत,” असा गंभीर आरोपही राऊतांनी केला.

 

नेहरूंचा वारसा नाकारता येणार नाही

नेहरूंच्या योगदानावर भाष्य करताना राऊत म्हणाले की, १५ ऑगस्ट १९४७ पासून देशाला स्वातंत्र्य मिळाले. देश कंगाल असताना नेहरू, बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार पटेल यांनी देशाला उभे केले. त्यांच्या योगदानाला नाकारणे चुकीचे आहे.

काँग्रेसने मजबूत होणे काळाची गरज

देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना राऊत म्हणाले, “मोदींच्या कारभाराला रोखण्यासाठी काँग्रेस अधिक मजबूत होणे गरजेचे आहे. जे पक्ष काँग्रेसच्या विचारधारेतून बाहेर पडले आहेत, त्यांनी पुन्हा एकदा एकत्र येणे काळाची गरज आहे. शरद पवार यांनी याकामी पुढाकार घेतला पाहिजे, त्यांनी नेतृत्व केल्यास मोदींचे हे कारस्थान रोखता येईल.

ट्रम्प आणि मोदींच्या संबंधांवर सवाल

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही राऊतांनी निशाणा साधला. “ट्रम्प आज वाह-वाह करतात, उद्या वेगळी भूमिका घेतात. भारताचे टँकर उडवले गेले, तेव्हा मोदींनी निषेध करण्याऐवजी चकार शब्द काढला नाही. ट्रम्प यांचे धोरण देशासाठी काय आहे, हे सर्वांना माहित आहे,” असेही ते म्हणाले.

Exit mobile version