Download App

Delhi Municipal Corporation पुन्हा राडा; भाजप-आप नगरसेवकांमध्ये तुफान हाणामारी

नवी दिल्ली : नुकतीच दिल्ली महापालिकेत (Delhi Municipal Corporation) महापौराची निवड झाली आहे. मात्र त्यानंतरही सभागृहात गदारोळ पाहायला मिळतोय. स्थायी समितीच्या निवडणुकीमध्ये भाजप (BJP) आणि आम आदमी पार्टीच्या (AAP) नगरसेवकांमध्ये तुफान हाणामारी झाली.

दोन्ही गटांचे नगरसेवक एक-दुसऱ्याला बुक्क्यांनी मारहाण करत होते, एकमेकांचे केस ओढत होते. आज स्टँडिंग कमिटी निवडणुकीसाठी मतदान झालं. या निवडणुकीदरम्यान थेट मारहाण झाली. यावेळी दुसऱ्यांदा काऊंटिंगची मागणी करण्यात आली होती. याच मुद्द्यावरुन भाजप आणि आपचे नगरसेवक समोरासमोर आले.

Arvind Kejriwal : पक्ष आणि नाव चोरलं… तरीही उद्धव ठाकरे वाघच

माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक कमलजीत शेहरावत यांनी आरोप केला की, नवनियुक्त महापौर शैली ओबेरॉय ह्या दिल्ली निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांचं आणि निगम सचिव कार्यालयातील अधिकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेत नव्हत्या. अधिकाऱ्यांनी मतगणना केली परंतु ओबेरॉय काहीही ऐकून घेण्याच्या मनःस्थिती नव्हत्या. त्यामुळे भाजप नगरसेवक संतापले. फेरमतमोजणीला महापौरांनी नकार दिल्याने हा राडा झाला.

सभागृहामध्ये सुरु झालेला वाद नंतर सभागृहाबाहेरच्या लॉबीमध्येही सुरु असल्याचं दिसून आलं. ही हाणामारी एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली की काही नगरसेवक पडले, काहींच्या पायांना दुखापत झाली, असं एका नगरसेवकाने सांगितलं. काही नगरसेवकांची या सर्व गोंधळादरम्यान घुसमट झाल्याने त्यांना भोवळ आली. अन्य सहकारी या नगरसेवकांना टेबलवर झोपवून कागदाने हवा घालतानाचे चित्र पहायला मिळालं. आपने भाजपाकडून सत्ता खेचून आणल्यानंतर महापौर निवडणुकीपाठोपाठ स्थायी समितीच्या निवडणुकीतही गोंधळ दिसून आला.

Tags

follow us