Download App

Video : उत्तरकाशीमध्ये ढगफुटी, डोंगरावरून पूर; 4 जणांचा मृत्यू

Cloudburst In Uttarkashi : गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस सुरु असल्याने अनेकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

  • Written By: Last Updated:

Cloudburst In Uttarkashi : गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस सुरु असल्याने अनेकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, उत्तरकाशीतील (Uttarkashi) धारली (Dharali) गावात ढगफुटी झाली आहे. अचानक झालेल्या ढगफुटीमुळे (Cloudburst) डोंगराचा ढिगारा पुराच्या स्वरुपात खाली आला. यात चार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तर दुसरीकडे ढगफुटीमुळे खीर गंगा उसळली यामुळे राळी बाजार आणि आजूबाजूच्या परिसरात मोठे नुकसान झाले आहे. तसेच काही लोक वाहून गेले असल्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे. तर लष्कर, पोलिस, एसडीआरएफ पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य देखील सुरु झाला आहे.

ढग फुटताच डोंगरावरून पूर

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, उत्तरकाशीतील धारली गावात दुपारी ढगफुटीची घटना घडली. ढगफुटीमुळे डोंगरावरुन पुराच्या स्वरुपात धारली गावात बराच ढिगार खाली आला आणि या पुरामध्ये अनेक लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ पाहायलानंतर पूर किती भयानक होता हे दिसून येते. तर दुसरीकडे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शार्दुल गुसैन यांनी सांगितले की, बचाव पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.

मुख्यमंत्र्यांनी घटनेबद्दल व्यक्त केले दुःख  

उत्तरकाशी येथील या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) म्हणाले की, धाराली (उत्तरकाशी) परिसरात ढगफुटीमुळे झालेल्या मोठ्या प्रमाणात नुकसानीची बातमी अत्यंत दुःखद आणि वेदनादायक आहे. एसडीआरएफ, एनडीआरएफ, जिल्हा प्रशासन आणि इतर संबंधित पथके मदत आणि बचाव कार्यासाठी युद्धपातळीवर कार्यरत आहेत. मी या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहे आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. मी सर्वांच्या सुरक्षिततेसाठी देवाकडे प्रार्थना करतो.

follow us