Download App

आगामी निवडणुकांसाठी नितीश कुमारांनी सांगितला फॉर्म्युला

CM Nitish Kumar Speak on Upcomming Election : आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने देशात विरोधकांकडून रणनीती ठरवली जात आहे. यातच राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी पार पडली. याचदरम्यान नितीश कुमार यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. तसेच अधिकाधिक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन एकत्र काम केले तर पुढील लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाविरुद्धच्या लढाईत चांगले यश मिळवता येईल असे नितीश कुमार हे म्हणाले आहे.

देशात 2024 ला होणाऱ्या निवडणुकांच्या अनुषंगाने विरोधी पक्षांकडून मोठ्या हालचाली करण्यात येत आहे. यातच मुख्यमंत्री नितीश कुमार हे आज मुंबई दौऱ्यावर आले होत. यादरम्यान त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

बैठकीनंतर सीएम नितीश कुमार म्हणाले की, भाजप देशात जे काही करत आहे ते देशाच्या हिताचे नाही, त्यामुळे सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे अशी आमची इच्छा आहे, त्यासाठी आम्ही आज चर्चा केली आणि सर्व पक्षांशी चर्चाही केली. होय, सर्वजण सहमत आहेत. आपण सर्व एकत्र बसून निर्णय घेऊ. आज खूप चांगली चर्चा झाली आणि आता सर्व काही देशाच्या हितासाठीच होणार आहे.

नितीश कुमार यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी ते म्हणाले, अधिकाधिक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन एकत्र काम केले तर पुढील लोकसभा निवडणुकीत भाजपविरुद्धच्या लढाईत चांगले यश मिळवता येईल. जेव्हा सर्वजण एकत्र लढतील तेव्हा लढत थेट भाजपशी होईल. यामधून विरोधी पक्षांना चांगले यश मिळेल आणि देशाची वाटचाल योग्य दिशेने होईल.आपली पुढील बैठक कधी होणार हे विरोधी पक्ष ठरवतील. असे नितीश कुमार म्हणाले आहे.

संजय राऊतांनी आता देवळात जाऊन ध्यान धारणा करावी, शहाजीबापूंचा खोचक टोला

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबत नितीश कुमार यांच्या या भेटीकडे 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी एकता मजबूत करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपविरोधात मजबूत आघाडी करण्यासाठी नितीश कुमार विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेत आहेत. गेल्या वर्षी भाजपसोबतची युती तोडल्यानंतर नितीश कुमार राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडले होते.

Tags

follow us