Drug Lord Arrested Manipur : हिंसाचाराच्या घटनेने मणिपूर जळत असल्याची परिस्थिती आहे. त्यावरुन मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागलीयं. अशातच आता मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण एका ड्रग्ज माफियाला सोडण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी दबाव टाकला असल्याचा आरोप मणिपूरच्या पोलिस अधिकारी थौनाजोम ब्रिंदा यांनी केला आहे. ब्रिंदा यांच्या आरोपानंतर मणिपुरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ब्रिंदा यांनी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. यासोबतच पोलिस खात्यातील काही वरिष्ठांनीही माझ्यावर दबाव टाकलं असल्याचा आरोप ब्रिंदा यांनी केला आहे.
पोलिस अधिकारी ब्रिंदा यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटलंय, 19 जून रोजी जिल्हा परिषद सदस्य लुहखोसेई जौ याच्या घरी पोलिसांच्या पथकाने धाड टाकली. या धाडीत 28 कोटी रुपयांचे ड्रग्ज आणि रोख रक्कमेसह जौ याला अटक करण्यात आली. तसेच पथकाने आरोपींकडून 4.595 किलो हेरॉईन, 2.80 लाख नशेच्या गोळ्या आणि 57.18 लाख रुपये, 95 हजारांच्या जुन्या नोटा आणि काही आक्षेपार्ह साहित्यांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आप खासदारावर सभापतींची कारवाई, संपूर्ण पावसाळी अधिवेशनासाठी निलंबित
त्यानंतर ब्रिंदा यांना भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष एम. अस्नीकुमार यांचा व्हॉट्सअॅप कॉल आला. त्यांनी मला मुख्यमंत्र्यांशी बोलण्यास सांगितले. मी मुख्यमंत्र्यांना सांगितले की, आम्ही जिल्हा परिषद सदस्य लुहखोसेई जौऊ यांच्या घरावर छाप्याबाबत सांगितलं.
मुख्यमंत्र्यांनी छाप्याविषयी ऐकल्यानंतर माझं कौतुक केलं, त्यानंतर आरोपींना अटक करण्याबाबत सांगितलं. तद्नंतर कारवाईच्या दुसऱ्याच दिवशी भाजप नेते अस्नी कुमार माझ्या घरी येत म्हणाले, अटक करण्यात आलेला परिषद सदस्य हा मुख्यमंत्र्यांच्या पत्नी ओलिसचा उजवा हात आहे.
त्याच्या अटकेमुळे मुख्यमंत्र्यांची पत्नी प्रचंड संतापात असल्याचं अस्त्री यांनी सांगितलं. जिल्हा परिषद सदस्य जौ यांच्याऐवजी त्यांची पत्नी आणि मुलाला अटक करुन सोडण्यात यावं, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. त्यावर ब्रिंदा म्हणाल्या, जौच्या घरातून ड्रग्ज जप्त करण्यात आले होते, त्यांच्या पत्नी किंवा मुलाकडून नाही, त्यामुळे त्यांना सोडले जाऊ शकत नाही. त्यांनतर पुन्हा अस्नीकुमार दुसऱ्यांदाही मला भेटायला आला आणि माझ्यावर ड्रग्ज माफियाला सोडण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ज्येष्ठ अभिनेते Dr. Mohan Agashe यांचा ‘पुण्यभूषण’ पुरस्काराने सन्मान! अनुपम खेर पोस्ट करत म्हणाले…
जौच्या अटकेनंतर न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. अखेर 21 मे रोजी न्यायालयाने ड्रगमाफिया जौ याला अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर फेसबुक लाईव्ह करीत पोलिस अधिकारी ब्रिंंदा यांनी न्यायालयाविरोधात टीका-टीप्पणी केली होती. त्यावरुन न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणई त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pankaja Munde : ‘पंकजांना भाजपमध्ये जास्त त्रास झाला तर’… भाऊ जानकरांचा निर्वाणीचा इशारा
मुख्यमंत्री म्हणाले :
ब्रिंदा यांनी 19 जून 2018 रोजी ड्रग्ज माफियाला 28 कोटी रुपयांच्या ड्रग्जच्या मुद्देमालासह अटक केली. त्यानंतर एका महिला पोलीस अधिकाऱ्यांनी माझ्यावर आरोप केले आहेत. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे, त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य होणार नाही.
दरम्यान, पोलिस अधिकारी ब्रिंदा यांच्या ड्रग्ज धाड प्रकरणाचा वाद आता मणिपूर उच्च न्यायालयात पोहचला असून त्यांची ब्रिंदा अंमली पदार्थ विभागात अतिरिक्त पोलिस अधीक्षक होत्या. आता त्यांची बदली करुन त्यांना मुख्यालयात पाठवण्यात आले आहे.