Supreme Court कडून ज्ञानवापी मशीद सर्वेक्षणाला स्थगिती; मुस्लिम पक्षाला उच्च न्यायालयात जाण्याचे आदेश

Supreme Court कडून ज्ञानवापी मशीद सर्वेक्षणाला स्थगिती; मुस्लिम पक्षाला उच्च न्यायालयात जाण्याचे आदेश

Varanasi Gyanvapi Mosque : काशी विश्वनाथ मंदिराजवळील मां शृंगार गौरी-ज्ञानवापी मशीद प्रकरणातील हिंदू बाजूची मागणी मान्य करून, शुक्रवारी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील न्यायालयाने वाजुखाना वगळता संपूर्ण ज्ञानवापी संकुलाचे पुरातत्व आणि वैज्ञानिक सर्वेक्षण करण्यास परवानगी दिली. मात्र आता या सर्वेक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. (Supreme Court Stay on Varanasi Gyanvapi Mosque Survey Muslims should go in High Court )

ज्येष्ठ अभिनेते Dr. Mohan Agashe यांचा ‘पुण्यभूषण’ पुरस्काराने सन्मान! अनुपम खेर पोस्ट करत म्हणाले…

वाराणसी येथील न्यायालयाने दिलेल्या सर्वेक्षणाच्या निर्णयाला मुस्लिम पक्षाने स्थगिती देण्यात यावी अशा मागणी केली होती. त्या याचिकेवर निर्णय देताना या सर्वेक्षणाला 26 जुलैपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तसेच कोर्टाने या मशीदीची तोडफोड केली जाऊ नये असे निर्देश दिले आहेत. यावर उत्तर प्रदेश सरकारचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी त्या ठिकाणी कोणतीही तोडफोड झाली नसल्याचं सांगितलं आहे.

BREAKING: अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन: वयाच्या 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

त्याचबरोबर या प्रकरणी मुस्लिम पक्षाने उच्च न्यायालयात अर्ज करावा. ज्ञानवापी मशीद मॅनेजमेंन्ट कमिटी अंजुमन इंतजामिया मशीदने या सर्वेक्षणाला स्थगिती देण्याची मागणी केली त्यावेळी त्यांच्याकडून ज्येष्ठ वकिल हुजैफा अहमदी यांनी बाजू मांडली.

काशी विश्वनाथ मंदिराजवळील मां शृंगार गौरी-ज्ञानवापी मशीद प्रकरणातील हिंदू बाजूची मागणी मान्य करून, शुक्रवारी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील न्यायालयाने वाजुखाना वगळता संपूर्ण ज्ञानवापी संकुलाचे पुरातत्व आणि वैज्ञानिक सर्वेक्षण करण्यास परवानगी दिली होती.

यासाठी एएसआयची टीम रविवारी उत्तर प्रदेशातील लखनऊला पोहोचली आणि वाराणसीच्या आयुक्तांचीही भेट घेतली. हिंदू पक्षाचे सर्व वकील पोलिस आयुक्तांच्या निवासस्थानी पोहोचले, रात्री उशिरापर्यंत त्यांची बैठक सुरू होती. हिंदू पक्षाचे वकील सुभाष नंदन यांनी ज्ञानवापी मशिदीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाचे काम श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी सुरू होऊ शकते असे सांगण्यात आले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube