BREAKING: ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन: वयाच्या 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

BREAKING: ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन: वयाच्या 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Jayant Sawarkar passed away: मराठी सिनेमा सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते तसेच प्रसन्न व्यक्तिमत्व अशी ओळख असणारे जयंत सावरकर (Jayant Sawarkar ) यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी मराठी सिनेमा आणि नाटकांमध्ये आपल्या अभिनयाची कला चाहत्यांना दाखवली होती. जयंत सावरकर यांचा जन्म गुहागरमध्ये ३ मे १९३६ दिवशी झाला होता. ते एक मराठी नाट्य आणि सिनेमा अभिनेते होते. (Jayant Sawarkar passed away)

वयाच्या २१ व्या वर्षापासून त्यांनी अभिनयाची कारकीर्दला सुरूवात केली होती. तसेच मराठी, हिंदी सिनेमा आणि सीरियलमध्ये आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या जयंत सावरकर यांची ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती. जयंत सावरकर यांच्या निधनानंतर अनेकांना मोठा धक्का बसला आहे. तसेच मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी शोक व्यक्त करत आहेत. गेल्या ४ दशकांपासून त्यांनी चाहत्यांचे नेहमीच मनोरंजन केले आहे. जयंत सावरकर हे उत्तम रंगकर्मी होते.

ज्येष्ठ अभिनेते Dr. Mohan Agashe यांचा ‘पुण्यभूषण’ पुरस्काराने सन्मान! अनुपम खेर पोस्ट करत म्हणाले…

जयंत सावरकर यांचा जन्म ३ मे १९३६ दिवशी झाला आहे. त्यांनी अनेक नाटके गाजवली आहेत. ‘अपराध मीच केला’, ‘अपूर्णांक’, ‘अलीबाबा चाळीस चोर’, ‘अल्लादीन जादूचा दिवा’, ‘आम्ही जगतो बेफाम’, ‘एकच प्याला’ अशी अनेक नाटके त्यांची गाजल्याचे दिसून येते. ‘एकच प्याला’ नाटकात त्यांनी तळीरामांची उत्तम भूमिका साकारल्याचे दिसून आले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube