Download App

‘सनातन’वरून योगी भडकले! ‘रावण, बाबर, औरंगजेब संपवू शकले नाहीतर हे तुच्छ..,’

  • Written By: Last Updated:

Yogi Adityanath on Sanatan Dharma : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचे सुपुत्र आणि मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी काही दिवसांपूर्वी सनातन धर्माची (Sanatan Dharma) तुलना डास, डेंग्यू, मलेरिया आणि कोरोनाशी केली होती. यानंतर भाजपने या विधानावर तीव्र आक्षेप घेतला घेतला होता. उदयनिधी यांच्या वक्तव्यावरून देशभरात वाद सुरू आहे. दरम्यान आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आपल्या शैलीत उत्तर दिलं. आपला देश सकारात्मकतेच्या दिशेने पुढे जातो आहे, तर हे लोकांना बघवत नाही, असं ते म्हणाले.

https://www.youtube.com/watch?v=Qbcr-Nl3sTI

योगी आदित्यनाथ म्हणाले की, सरकारने ज्या योजना आणल्या आहेत, जी कामं केली आहेत. त्यावर सनातन शब्दाचा वापर करून सगळं काही बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, जे विरोध करत आहेत, ते विसरले आहेत की रावणाचा अहंकार असो की बाबर, औरंगजेबाचा अत्याचार असो तेव्हाही सनातन संपला नाही, अशात असले तुच्छ लोक काय सनातन संपवणार?

Ahmedanagar News : पाऊस पडून दुष्काळाचे संकट मिटू दे! बळीराजासाठी आमदार काळेंचे देवाकडे साकडे 

योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, लोक आपला मूर्खपणा सिद्ध करण्यासाठी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करत आहेत. पण सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तरी ती थुंकी त्यांच्याच तोंडावर पडते हे त्यांना माहीत नाही. देवाच्या शक्तीला आव्हान देणारे रावण, हिरण्यकश्यप, कंस यांसारख्या राक्षसांना पराभवाची चव चाखावी लागली आणि देव आजही आहे. सनातन धर्म हे सत्य आहे ज्याचा कधीही नाश होत नाही. सनातन धर्माची भरभराट होत असताना राम मंदिर उभे राहते आहे, ही देवाची कृपा आहे, असंही ते म्हणाले.

सनातन धर्माबद्दल वादग्रस्त टिप्पणी
उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्यामुळे सनातन धर्म या शब्दावरून वाद सुरू झाला आहे. २ सप्टेंबर रोजी चेन्नाई येथील आयोजित कार्यक्रमात सनातन धर्मावर बोलतांना त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू, मलेरिया आणि कोरोनाशी केली. या धर्माला केवळ विरोध करून चालणार नाही तर हा धर्म संपवला पाहिजे. हा धर्म सामाजिक न्याय आणि समतेला विरोध करणारा आहे. काही गोष्टींना नुसता विरोध करून चालणार नाही, तर ते संपवले पाहिजे, असे ते म्हणाले होते. त्यांच्या वक्तव्याने देशभरात वातावरण पेटलं आहे.

Tags

follow us