Ahmedanagar News : पाऊस पडून दुष्काळाचे संकट मिटू दे! बळीराजासाठी आमदार काळेंचे देवाकडे साकडे
Ahmedanagar News : यंदा जिल्ह्यात पावसाने अक्षरश पाठ फिरवली आहे. पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच कोपरगाव येथील मतदार संघात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांनी आपल्या गावी माहेगाव देशमुख येथे ग्रामदैवत श्री दत्त मंदिरात महापूजा केली. तसेच यावेळी कोपरगाव मतदार संघात भरपूर पाऊस पडावा व दुष्काळाचे सावट हटू दे असे दत्त महाराजांना साकडे घातले.
दिव्यांगांच्या निधीबाबत योग्य भूमिका न घेतल्यास बेमुदत उपोषण; बच्चू कडूंचा सरकारला इशारा
कोपरगाव मतदारसंघासह राज्यात यावर्षी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून कोपरगावसह राज्यात वरुणराजाने आपली कृपा करावी यासाठी आज माहेगाव देशमुख येथे श्री दत्त मंदिरात पूजा केली. राज्यात पाऊस पडून दुष्काळाचे संकट मिटू दे व बळीराजाला ह्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी शक्ती दे अशी श्री दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना केली.
Pune News : ‘आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं’; पुण्यातही मराठा समाज रस्त्यावर
मी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कोपरगाव मतदारसंघात सर्वधर्मीय समाजबांधवांनी आपापल्या धर्मस्थळावर जाऊन पाऊस पडण्यासाठी प्रार्थना केली असून आपल्या सर्वांचे गाऱ्हाणे वरुणराजा नक्की ऐकेल व पुढील काळात समाधानकारक पाऊस होईल असा मला विश्वास आहे असे काळे यांनी म्हंटले.
दरम्यान, राज्यात यावर्षी सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोपरगाव मतदार संघात देखील दुष्काळाच्या परिस्थितीमुळे सोयाबीन,बाजरी, मका,कापूस, तुर, मका आदी खरीप पिकांचे मोठे नुकसान होवून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्याचबरोबर रब्बी हंगामाचे भवितव्य देखील टांगणीला लागले आहे.