Common Wealth Games 2026 : भारताची स्टार वेटलिफ्टर आणि ऑलिम्पिक पदकविजेती मीराबाई चानू हिने पुन्हा एकदा आपल्या दमदार कामगिरीने देशाची मान उंचावलीय. कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये (CommonWealth Games 2026) महिलांच्या 48 किलो वजनी गटात शानदार प्रदर्शन केले. तिने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. या विजयासह मीराबाईने राष्ट्रकुल स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकत गोल्डन हॅट्ट्रिक केलीय. (Common Wealth Games 2026 : india star weightlifter mirabai chanu win gold medal)
मीराबाई चानूने घडवला इतिहास
महिलांच्या 48 किलो वजनी गटात मीराबाईने 85 किलो वजन उचलत इतिहास रचला. तिने तिसऱ्या प्रयत्नात सहज 85 किलो वजन उचलून नवा कॉमनवेल्थ विक्रम आपल्या नावावर कोरलाय. याआधी तिने 82 किलो वजन उचलून राष्ट्रकुल स्पर्धेचा विक्रम मोडला. त्यानंतर 85 किलो वजन उचलून स्वतःचाच विक्रम अधिक उंचावला आहे.
विद्यार्थ्यांच्या एकजुटीने सत्तेचा अहंकार मोडला; पुढील लढ्यांसाठीही सज्ज राहा – रोहित पवार
Calm. Composed. Record-breaking. 🏋️♂️
Mirabai Chanu lifts 85 kg to set a new Commonwealth Games snatch record 🙌
Watch the Commonwealth Games LIVE NOW exclusively on Sony Sports Network TV channels and Sony LIV.#SonySportsNetwork #SonyLIV #Glasgow2026 #GlasgowMeinTiranga… pic.twitter.com/iMrBXx3Sv1
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 26, 2026
ऐतिहासिक कामगिरी
मीराबाईने उचललेले 85 किलो वजन हे राष्ट्रकुल स्पर्धांच्या इतिहासातील सर्वाधिक वजन ठरले आहे. एवढेच नव्हे, तर राष्ट्रकुल देशांतील कोणत्याही खेळाडूने ऑलिम्पिक, जागतिक अजिंक्यपद स्पर्धा किंवा इतर कोणत्याही मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उचललेले हे सर्वोच्च वजन मानले जात आहे. त्यामुळे तिच्या नावावर आणखी एका ऐतिहासिक विक्रमाची नोंद झाली आहे.
भारताला दुसरे पदक; वेटलिफ्टर ऋषिकांत सिंगने 60 किलो वजनीगटात जिंकले रौप्य
पहिल्या प्रयत्नात अपयश, पण नंतर शानदार पुनरागमन
82 किलो वजन उचलण्याच्या पहिल्या प्रयत्नात मीराबाईला अपयश आले. वजन डोक्यावर उचलल्यानंतर ती पूर्णपणे सरळ उभी राहू शकली नाही आणि अखेरीस तिला बारबेल खाली सोडावी लागली. मात्र, त्यानंतर तिने जबरदस्त पुनरागमन करत दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रयत्नात यशस्वी लिफ्ट पूर्ण केली आणि सुवर्णपदकासह नवा विक्रमही आपल्या नावावर केला.
