Sonia Gandhi: काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह (PM Narendra Modi) अन्य भाजप नेत्यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. यानंतर आता सोनिया गांधी यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
शनिवारी बिहारच्या मुझफ्फरपूर न्यायालयात वकील सुधी ओझा यांनी ही तक्रार दाखल केली. राष्ट्रपतींचा अपमान केल्याबद्दल एफआयआर दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना द्यावेत अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे. इतकेच नाही तर खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधी यांच्यावरही (Priyanka Gandhi) कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मोठी बातमी! दिल्लीच्या CM अतिशी यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल; कारण काय?
तक्रार दाखल केल्यानंतर वकील सुधीर ओझा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सोनिया गांधी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बिचारी म्हणून संबोधित केलं. हा राष्ट्रपतींचा अपमान आहे. देशाच्या सर्वोच्च संवैधानिक पदाचा हा अपमान आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांनाही यात सहआरोपी केले पाहिजे. त्यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलमांतर्गत खटला दाखल करायला हवा असे ओझा यांनी सांगितले. या प्रकरणी आता येत्या 10 फेब्रुवारी रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे.
संसदेत राष्ट्रपतींचं अभिभाषण झाल्यानंतर सभागृहाबाहेर प्रसारमाध्यमांनी सोनिया गांधींना अभिभाषणाबद्दल विचारण्यात आले. पत्रकारांच्या प्रश्नांचे उत्तर देताना सोनिया गांधी म्हणाल्या, राष्ट्रपती यांची भाषण करताना चांगलीच दमछाक झाली. त्या कशाबशा बोलत होत्या. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यांच्या याच वक्तव्यावर भाजप नेत्यांनी सडकून टीका केली होती. नंतर काँग्रेस नेत्यांनी स्पष्टीकरण देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.
सोनिया गांधी या वक्तव्यावर राष्ट्रपती कार्यालयाकडूनही उत्तर देण्यात आलं. सोनिया गांधींनी केलेल्या वक्तव्याचा स्वीकार केला जाऊ शकत नाही असे राष्ट्रपती कार्यालयाकडून सांगण्यात आले. आता या घडामोडींनंतर देशातील राजकारण चांगलच ढवळून निघत आहे. यावर काँग्रेसच्या नेत्यांकडून आणखी काय प्रतिक्रिया येतात, पुढे आणखी काय घडामोडी घडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Union Budget 2025: पगारदारांसाठी बजेट गेमचेंजर ! पण रुपया कसा येणार आणि कसा जाणार ?