Download App

कॉंग्रेस-आपची युती संपुष्टात? दिल्ली आणि हरियाणामध्ये स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा

काँग्रेस आणि आम आदमी पक्ष स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती खुद्द काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिली.

Congress-AAP Will Fight Independant : लोकसभा निवडणुकीमध्ये दिल्लीत एकत्र निवडणुका लढवणारे काँग्रेस (Congress) आणि आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) आता तंत्रपणे निवडणुका लढणार असल्याची माहिती आहे. दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती खुद्द काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमे (Jairam Ramesh) यांनी दिली.

मी 20-20 खेळू शकतो, गोऱ्हेंनी फार न्याय दिला नाही; निलंबन मागे घेताच ठाकरेंच्या वाघाची ‘डरकाळी’ 

दिल्ली-हरियाणामध्ये दोघेही वेगळे लढतील

आप आणि कॉंग्रेसने लोकसभा निडणुकीत स्वबळावर लढण्याच्या घोषणा केल्या होत्या. मात्र, भाजपचा पराभव करण्यासाठी हे दोन्ही पक्ष लोकसभा निवडणुकीत एकत्र आले होते. या दोन्ही पक्षांनी दिल्लीतील लोकसभेच्या जागा एकत्रितपणे लढल्या होत्या. मात्र, आता विधानसभा निडणुकासांठी हे पक्ष स्वबळावर निवडणुका लढवतील, अशी चर्चा सुरू असतांना कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी तशी घोषणा केली आहे. दिल्ली आणि हरियाणामध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टी स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत. हरियाणा आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि आप यांच्यात युतीला कुठलाही वाव नाही, असं जयराम रमेश यांनी आज जाहीर केले.

महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये इंडिया एकत्र लढणार

जयराम रमेश म्हणाले की, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये इंडिया आघाडी एकत्र निवडणुका लढवणार आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत जयराम रमेश म्हणाले की, राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी इंडिया आघाडीने कोणताही एकच फॉर्म्युला स्वीकारला नाही.

 

ते म्हणाले, ज्या राज्यांमध्ये काँग्रेसचे नेते आणि इंडिया आघाडीचे नेते युतीवर सहमत असतील तेथेच इंडिया आघाडी एकत्रिपपणे निवडणुका लढेल. झारखंड आणि महाराष्ट्रात इंडिया आघाडी एकत्रितपणे निडवणुका लढवणार आहे. त्या त्या राज्यातील स्थानिक पक्षांना सोबत घेऊन भाजपचा पराभव करण्याचं कॉंग्रेसचं धोरण असल्याचं त्यांनी स्षष्ट केलं.

follow us

वेब स्टोरीज