बंगळुरूच्या बैठकीसाठी काँग्रेसचे स्पेशल 26, आणखी दोन पक्षांना निमंत्रण

Opposition Unity : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय पातळीवर महाआघाडी स्थापन करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. यासाठी विरोधी पक्षांची पुढील बैठक 17 आणि 18 जुलै रोजी बेंगळुरू येथे होणार आहे. विरोधी पक्षांची ताकद वाढवण्यासाठी काँग्रेसने आणखी दोन छोट्या पक्षांना या बैठकीची निमंत्रणे पाठवली आहेत. काँग्रेसने यूपीच्या अपना दल (के) आणि तामिळनाडूतील एका प्रादेशिक पक्षाला बेंगळुरू येथील […]

Congress

Congress

Opposition Unity : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय पातळीवर महाआघाडी स्थापन करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. यासाठी विरोधी पक्षांची पुढील बैठक 17 आणि 18 जुलै रोजी बेंगळुरू येथे होणार आहे. विरोधी पक्षांची ताकद वाढवण्यासाठी काँग्रेसने आणखी दोन छोट्या पक्षांना या बैठकीची निमंत्रणे पाठवली आहेत. काँग्रेसने यूपीच्या अपना दल (के) आणि तामिळनाडूतील एका प्रादेशिक पक्षाला बेंगळुरू येथील बैठकीसाठी आमंत्रित केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपना दल (के) प्रमुख कृष्णा पटेल विरोधी पक्षांच्या बैठकीत सहभागी होऊ शकतात. त्यामुळे बेंगळुरू सभेसाठी निमंत्रित पक्षांची संख्या 26 झाली आहे. यापूर्वी 23 जून रोजी बिहारच्या पाटणा येथे विरोधी पक्षांची बैठक झाली होती. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या आवाहनावरून ही बैठक झाली होती.

या बैठकीसाठी 16 पक्षांना आमंत्रित करण्यात आले होते त्यापैकी 15 पक्षांनी या बैठकीला हजेरी लावली. कौटुंबिक कार्यक्रमामुळे आरएलडीचे जयंत चौधरी बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. या बैठकीत या राजकीय पक्षांच्या 30 हून अधिक नेत्यांनी निवडणुकांबाबत समान रणनीतीवर चर्चा केली.

एकनाथ शिंदे यांची झोप उडविणारा तर अजितदादांचे स्वप्न भंग करणाारा सर्व्हे

काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांची दुसरी बैठक होत आहे. ही बैठक आधी शिमल्यात होणार होती, मात्र खराब हवामानामुळे ती जागा बदलण्यात आली. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 17 जुलै रोजी बंगळुरूमध्ये विरोधी पक्षांसाठी डिनरचे आयोजन केले असून 18 जुलै रोजी बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधीही सहभागी होणार आहेत.

राष्ट्रवादीतील बंडानंतर मतदारांची शरद पवारांना सहानुभूती, सर्व्हेतून अजित पवारांना धक्का

या बैठकीला सर्व प्रमुख विरोधी पक्षनेते उपस्थित राहणार आहेत. टीएमसी प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बैठकीला उपस्थित राहण्याबाबत साशंकता होती, मात्र आता त्याही बैठकीला उपस्थित राहणार आहेत. पीटीआयने टीएमसीच्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, ममता बॅनर्जी 17 जुलै रोजी विरोधी डिनरला उपस्थित राहणार नाहीत कारण त्यांना शस्त्रक्रियेनंतरच्या प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल, परंतु त्या 18 जुलै रोजी विरोधी पक्षांच्या बैठकीत उपस्थित राहतील.

Exit mobile version