राष्ट्रवादीतील बंडानंतर मतदारांची शरद पवारांना सहानुभूती, सर्व्हेतून अजित पवारांना धक्का

राष्ट्रवादीतील बंडानंतर मतदारांची शरद पवारांना सहानुभूती, सर्व्हेतून अजित पवारांना धक्का

NCP Voter survey : अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आहे. बहुतांश आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला. पण सामने केलेल्या सर्व्हेत अजित पवार यांच्यासाठी धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. राष्ट्रवादीतील बंडानंतर पक्षातील मतदारांची शरद पवार यांना सहानुभूती मिळणार का? असा सवाल करण्यात आला होता. यामध्ये 46.5 टक्के लोकांनी शरद पवार यांना सहानुभूती मिळणार असे म्हटले आहे.

राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आम्ही जनतेच्या न्यायालयात जावू असे म्हटले होते. त्यानंतर त्यांनी कराड येथे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन महाराष्ट्र दौरा सुरु केला होता. त्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत जवळचे असलेले आणि अजित पवार यांच्या गटात गेलेले छगन भुजबळ यांच्या मतदार संघात जनतेशी संवाद साधला होता. या दोन्ही ठिकाणी शरद पवार यांना जनतेचा पाठिंबा मिळतानाचे दृश्य होते. यावेळी येवल्यातून त्यांनी जनतेची माफी मागत चूक सुधारण्याचे भावनिक अवाहन केले होते.

Shahajibapu Patil : अजित पवार मविआत निराशेतून उपमुख्यमंत्री, आता ते युतीत आल्यानं मी आनंदी

त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांच्या गटात गेले असले तरी कार्यकर्ते आणि मतदार शरद पवार यांच्या पाठिशी असल्याचे दिसून येते. सर्व्हेतील 46.5 टक्के लोकांनी शरद पवार यांना सहानुभूती मिळेल असे सांगितले तर 23.3 टक्के लोकांनी शरद पवारांना सहानुभूती मिळनार नाही असे म्हटले आहे. याशिवाय 30.2 टक्के लोकांनी सांगता येत नाही असे म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube