एकनाथ शिंदे यांची झोप उडविणारा तर अजितदादांचे स्वप्न भंग करणाारा सर्व्हे
2024 Who is Maharashtra’s favorite CM? अजित पवार मूळ राष्ट्रवादीत असताना महाविकास आघाडीच्या बाजूने जनतेचा कौल असल्याचे अनेक सर्व्हेतून दिसून येते होते. आता राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर राज्यातील राजकीय समिकरणं बदलली आहेत. त्यामुळे जनतेचाही मूड बदलला आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री कोण होणार? असा सामने सर्व्हे केला. या सर्व्हेतून एकनाथ शिंदे यांची झोप उडविणारी आकडेवारी समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री फक्त ८.५ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.
या सर्व्हेत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, बाळासाहेब थोरात, उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण, जयंत पाटील, सुप्रिया सुळे या राज्यातील दिग्गज नेत्यांच्या नावाचा समावेश सर्व्हेच्या संभाव्या मुख्यमंत्रीपदाच्या यादीत केला होता. या सर्व्हेत देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी फाईट होताना दिसत आहे. तर मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न बाळगणारे अजित पवार आणि विद्यामान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे.
राष्ट्रवादीतील बंडानंतर मतदारांची शरद पवारांना सहानुभूती, सर्व्हेतून अजित पवारांना धक्का
जनतेचा कौल काय?
सर्व्हेतून जनतेचा कौल समोर आला आहे. त्यानुसार कोणत्या भावी मुख्यमंत्र्याला महाराष्ट्रातील जनतेनं किती टक्के पसंती दिली आहे? ही आकडेवारी खालील प्रमाणे…
देवेंद्र फडणवीस – २१.९ टक्के
उद्धव ठाकरे – १९.४ टक्के
सांगता येत नाही – १७.७ टक्के
अजित पवार – ९.५ टक्के
एकनाथ शिंदे – ८.५ टक्के
सुप्रिया सुळे – ८.५ टक्के
अशोक चव्हाण – ६.६ टक्के
बाळासाहेब थोरात – ४.२ टक्के
जयंत पाटील – ३.६ टक्के