Rahul Gandhi On PM Narendra Modi : कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच उडाली आहे. काँग्रेस व भाजप यांच्याकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. काँग्रेस व भाजप या दोन्ही राजकीय पक्षांकडून या निवडणुकीसाठी 40 स्टार प्रचारकांची टीम उतरवण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्हीवरील एका कार्यक्रमात बोलताना एक गोष्ट सांगितली होती. त्यामध्ये एक इंग्रजी शिकवणाऱ्या प्राध्यापकाची मुलगी आत्महत्या करते. यानंतर तिने लिहलेली सुसाइड नोट तिच्या वडिलांना सापडल्यावर त्यातील स्पेलिंग चुकीमुळे तिचे वडील नाराज होतात, असे मोदींनी म्हटले होते.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी वंदे भारत ट्रेनवर खासदाराचे पोस्टर चिकटवले, गुन्हा दाखल
यावरुन आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी जोरदार निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, हजारो परिवारांनी आत्महत्येमुळे आपल्या मुलांना गमावले आहे. पंतप्रधानांनी त्यांची खिल्ली नाही उडवली पाहिजे, अशा शब्दात राहुल गांधींनी मोदींना सुनावले आहे.
This tweet is for this video pic.twitter.com/jWdP0ade0J
— Abhishek Anand Journalist 🇮🇳 (@TweetAbhishekA) April 27, 2023
तर प्रियंका गांधी यांनी देखील आत्महत्या हा विषय तरुणांमध्ये काही चेष्टेचा नाही, असे मोदींना म्हटले आहे. एनसीआरबींच्या आकडेवारीनुसार 2021 मध्ये 1,64,033 लोकांनी आत्महत्या केली आहे. यामधील मोठा आकडा हा वय वर्ष 30 पेक्षा कमी असलेला होता. हा देशासाठी एक त्रासाचा विषय असून, यावर मस्करी होऊ शकत नाही, असे त्या म्हणाल्या आहेत.
Depression and suicide, especially among the youth IS NOT a laughing matter.
According to NCRB data, 164033 Indians committed suicide in 2021. Of which a huge percentage were below the age of 30. This is a tragedy not a joke.
The Prime Minister and those laughing heartily at… pic.twitter.com/yoPt5c8Kx7
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) April 27, 2023
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्हीवर एका कार्यक्रमात बोलताना लाइटर नोटवर त्यांच्या एका शब्दाच्या संदर्भात उदाहरण दिले. त्यावरुन काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर असंवेदनशील असल्याचा आरोप केला आहे.
Ajit Pawar यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीत हालचाली, ‘या’ नेत्याने दिला दुजोरा