Download App

“जर निष्पक्ष निवडणुका झाल्या असत्या तर भाजपाला…” राहुल गांधींचा खळबळजनक खुलासा

संसदेत मी आता म्हणू शकतो की मिस्टर मोदी, 56 इंच का सीना, भगवान से सीधा संबंध.. यांसारख्या गोष्टी आता इतिहासजमा झाल्या आहेत. 

Rahul Gandhi : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या (Rahul Gandhi) अमेरिका दौऱ्यावर आहेत. राहुल गांधींनी काल वॉशिंग्टन डीसी येथील जॉर्जटाऊन युनिव्हर्सिटीत पोहोचले. येथे त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) जोरदार टीका केली. राहुल गांधी म्हणाले, निवडणुकीच्या आधी आम्ही (Lok Sabha Elections) या मुद्द्यावर जोर देत राहिलो की देशातील संस्था ताब्यात घेतल्या जात आहेत. आरएसएसने शिक्षण व्यवस्थेवर कब्जा केला आहे. मिडिया आणि तपास यंत्रणाही ताब्यात गेल्या आहेत. आम्ही या गोष्टी सांगत राहिलो मात्र लोकांना समजत नव्हते. नंतर संविधानाला पुढे करण्यास सुरुवात केली.

देशातील गरीब लोकांच्या लक्षात आले की संविधानाचे रक्षण करणारे आणि संविधान नष्ट करण्याच्या प्रयत्नात असलेल्यांत ही लढाई आहे. जातनिहाय जनगणनेचा मुद्दा आता देशव्यापी होऊ लागला आहे. या सगळ्या गोष्टी अचानक एकसाथ पुढे येऊ लागल्या आहेत. मला वाटत नाही की निष्पक्ष निवडणुकीत भाजप 246 संख्येच्या जवळ होते. त्यांच्याकडे मोठे आर्थिक मार्ग होते. त्यांनी आमचे बँक खाते सुद्धा बंद करून टाकले होते.

Rahul Gandhi : काँग्रेसला बसणार धक्का, 99 खासदार होणार अपात्र? याचिका दाखल

जे भाजपला हवं होतं त्याच गोष्टी निवडणूक आयोग सांगत होतं. नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) देशभरात काम करता यावं या पद्धतीने संपूर्ण अभियान तयार करण्यात आलं होतं. ज्या राज्यात भाजपाची ताकद कमी होती त्या राज्यांचा वेगळ्या पद्धतीने विचार करण्यात आला. या निवडणुकांना मी स्वतंत्र म्हणून पाहत नाही. या निवडणुका नियंत्रित होत्या. याच अँगलने मी या निवडणुकांकडे पाहतो असे राहुल गांधी म्हणाले.

आमच्याकडे निष्पक्ष खेळाचे मैदान नव्हते. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आर्थिक मार्ग होते. त्यांनी आमचे बँक खाते सुद्धा बंद करून टाकले होते. जर निष्पक्ष पद्धतीने निवडणुका झाल्या असत्या तर भाजपा 246 च्या जवळही पोहोचला नसता, असा खळबळजनक खुलासा काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अमेरिकेत केला. त्यांच्या या वक्तव्यावर आता भाजप नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

56 इंच का सीना इतिहासजमा

निवडणुकीनंतर आता देशात बरच काही बदललं आहे. काही लोक म्हणतात की आता आम्हाला भीती वाटत नाही. भाजपा आणि नरेंद्र मोदींनी इतकं भीतीचं वातावरण तयार केलं होतं, यंत्रणा आणि लहान व्यावसायिकांवर दडपण आणलं होतं पण काही सेकंदातच आता सगळं गायब झालं आहे. या भीतीला पसरवण्यात त्यांना अनेक वर्षे लागली पण आता ही भीती काही सेकंदातच निघून गेली आहे. संसदेत मी आता म्हणू शकतो की मिस्टर मोदी, 56 इंच का सीना, भगवान से सीधा संबंध.. यांसारख्या गोष्टी आता इतिहासजमा झाल्या आहेत.

हरियाणात ‘आप’ कमकुवत तरीही आघाडीसाठी काँग्रेसचा आग्रह; राहुल गांधींची स्ट्रॅटेजी काय?

 

follow us