Rahul Gandhi On Himanta Biswa Sarma : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) देशातला सर्वात मोठा भ्रष्ट मुख्यमंत्री असल्याचा हल्लाबोल काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जुने मित्र हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर केला आहे. दरम्यान, भारत जोडो यात्रेनंतर आता राहुल गांधी यांची न्याय यात्रा सुरु आहे. मणिपूरपासून सुरु झालेली ही न्याय यात्रा सध्या आसाममध्ये आहे. यावेळी आयोजित छोटेखानी सभेतून राहुल गांधी यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांवर टीका केलीयं.
हिंदुस्तान का सबसे भ्रष्ट मुख्यमंत्री कौन है?
जवाब है: हिमंता बिस्वा सरमा और ये बात असम की जनता और पूरा देश जानता है।
जो लोग हमें धमका रहे हैं, वो ये जान लें कि ये राहुल गांधी की यात्रा नहीं है, असम की जनता की यात्रा है।
राहुल गांधी और असम की जनता मुख्यमंत्री से डरते नहीं… pic.twitter.com/gkAfwqqWSD
— Congress (@INCIndia) January 21, 2024
राहुल गांधी म्हणाले, तुम्हाला माहीत आहे की, सध्या आसाममध्ये काय होत आहे. देशातला सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री कोण आहे? काय नाव त्याचं? संपूर्ण देश आणि आसामला माहिती आहे की तुमचा मुख्यमंत्री आणि त्यांचं कुटुंब भ्रष्ट असल्याचं राहुल गांधी म्हणाले आहेत.
गयाहून रशियाला जाणारे Falcon 10 विमान कोसळले, 4 क्रू मेंबरसह 6 जण बेपत्ता
तसेच हे लोकं विचार करतात की, लोकांना घाबरुन, धमकावून, दबाव टाकून त्यांना घाबरवू, हे लोकं यात्रेची परवानगी नाकरतात झेंडे जाळतात बॅनर पाडून टाकतात पण त्यांना ही न्याय यात्रा राहुल गांधीची नाहीतर आसामच्या जनतेची यात्रा आहे. जनतेला जे करायचं आहे ते जनता करु शकते . आसामची जनता आणि राहुल गांधी मुख्यमंत्र्यांना घाबरत नाहीत हे त्यांना माहित असल्याचंही राहुल गांधी म्हणाले आहेत.
Ram Mandir : 22 जानेवारीला ऐतिहासिक सोहळा, प्राणप्रतिष्ठेविषयी विदेशी माध्यमांत नेमकी काय चर्चा?
राहुल गांधी अन् हिमंता बिस्वा सरमा यांची जुनी मैत्री…
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आधीच्या काळात काँग्रेसमध्येच सक्रिय होते. काँग्रेसमध्ये असताना राहुल गांधी आणि हिमंता बिस्वा सरमा यांचे मैत्रीचे संबंध होते. मात्र, हिमंता बिस्वा यांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केला.
दरम्यान, राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रा काढत असून, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश राज्यांचा दौरा करून आज ही यात्रा आसाममध्ये पोहोचली. यावेळी राहुल गांधी वैष्णव संताच्या जन्मस्थानाला भेट देणार असल्याचंही काँग्रेस पक्ष बोलत आहेत.