‘भारत न्याय यात्रे’वर आसाममध्ये हल्ला : वाहनांची तोडफोड, राहुल गांधी सुरक्षित

‘भारत न्याय यात्रे’वर आसाममध्ये हल्ला : वाहनांची तोडफोड, राहुल गांधी सुरक्षित

जामुगुरी : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वातील भारत न्याय यात्रेवर (Bharat Nyay Yatra) आसाममधील जामुगुरी येथे हल्ला करण्यात आल्याचे वृत्त आहे. यात्रेतील काही वाहनांवर हल्ला करण्यात आला असून कॅमेरामनलाही मारहाण झाल्याची माहिती आहे. दरम्यान, हा हल्ला भाजपच्या समर्थकांनी केला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. (Attack on Bharat Nyaya Yatra led by Congress leader Rahul Gandhi in Jamuguri, Assam)

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधींच्या आगमनापूर्वी भाजप कार्यकर्ते भारत न्याय यात्रेच्या मार्गावर मोर्चा काढत होते, तेव्हा भारत न्याय यात्रेची काही वाहने त्या भागातून जात होती. त्याचवेळी भाजप समर्थकांनी काही वाहनांची तोडफोड केली आणि भारत न्याय यात्रेच्या कॅमेरामॅनवरही हल्ला केला, असा आरोप केला जात आहे. या हल्ल्यात राहुल गांधी सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे.

यापूर्वीही राहुल गांधींच्या ‘भारत न्याय यात्रे’विरोधात आसाममधील जोरहाट शहरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जोरहाट शहरातील ज्या मार्गावरून ‘भारत जोडो न्याय यात्रा’ गेली त्या मार्गावरुन जाण्यास यात्रेला परवानगी नव्हती. त्यानंतर पोलिसांनी ‘भारत जोडो न्याय यात्रा’ आणि त्याचे आसाममधील मुख्य आयोजक केबी बायजू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आसामच्या मुख्यमंत्र्यांवर राहुल गांधींची टीका :

दरम्यान, कालच राहुल गांधी यांनी भाजपचे नेते आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर जोरदार टीका केली होती. हिमंता बिस्वा सरमा हे देशातला सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री असल्याचे राहुल गांधी म्हणाले होते. तुम्हाला माहीत आहे की, सध्या आसाममध्ये काय होत आहे. देशातला सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री कोण आहे? काय नाव त्याचं? संपूर्ण देश आणि आसामला माहिती आहे की तुमचा मुख्यमंत्री आणि त्यांचे कुटुंब भ्रष्ट आहे, असे ते म्हणाले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube