‘इंडिया’च्या व्यासपीठावर प्रकाश आंबेडकर आले; पण ठाकरे, पवारांसमोरच थेट घराणेशाहीवर बोलले !

  • Written By: Published:
‘इंडिया’च्या व्यासपीठावर प्रकाश आंबेडकर आले; पण ठाकरे, पवारांसमोरच थेट घराणेशाहीवर बोलले !

Bharat Jodo Nyay Yatra-Prakash Ambedkar : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची (Bharat Jodo Nyay Yatra) सांगता मुंबईत झाली. त्यानंतर इंडिया आघाडीची सभा मुंबईतील शिवाजी पार्कवर झाली. या सभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे व्यासपीठावर होते. त्यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) व गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. परंतु इंडिया आघाडीतील घराणेशाहीवर बोलण्यास आंबेडकर मागे हटले नाहीत. या निवडणुकीत विशिष्ट जातीतील उमेदवारांना, घराणेशाहीतील उमेदवारांना तिकीट देऊ नका, अशी जाहीर मागणीच प्रकाश आंबेडकर यांनी केलीय.

Manoj Jarange : लोकसभेपूर्वी निलेश लंकेच्या बालेकिल्ल्यात जरांगेची सभा, कोणावर साधणार निशाणा?

प्रकाश आंबेडकर यांचे पाच मिनिटाचे भाषण झाले. ते म्हणाले, एकत्र लढू किंवा वेगळे लढू पण लढले पाहिजे. मी देशभरातील परिस्थिती सांगतो. बंगालमध्ये वेगळी परिस्थिती झाली आहे. महाराष्ट्रात आम्ही सर्व एकत्र लढलो पाहिजे, असा प्रयत्न सुरू आहे. इलेक्टोरल बॉंडवरून ते म्हणाले, प्रत्येक चॅनेलवर अमित शाह सांगत आहेत देशातून काळे धन गेले आहे. मी मोदी आणि अमित शाह यांना विचारतो, फ्युचर गेमिंग कंपनीचा 2021-22ची निव्वळ नफा 215 कोटी आहे. या कंपनीने तेराशे कोटी रुपयांचे इलेक्टोरल बॉंड कसे खरेदी केले हे सांगितले पाहिजे. अमित शाह यांनी यावर उत्तर दिले पाहिजे. मोदींना यावर सवाल विचारला पाहिजे.

Rahul Gandhi यांच्याकडून महात्मा गांधींच्या आठवणींना उजाळा, पाहा फोटो

इव्हीएमविरोधात आम्ही लढत आहोत. त्याविरोधात मुंबई हायकोर्टात गेलो आहे. गेल्या सहा महिन्यांपासून इव्हीएम चौकशीचे मागणी करत आहे. परंतु निवडणूक आयोग टाळत आहे. इव्हीएमबरोबर पेपर ट्रेल (व्हीव्हीपॅट) ची मोजणी झाली पाहिजे. त्याविरोधात सर्वच विरोधपक्षांनी निवडणूक आयोगाला घेराव घातला पाहिजे, असे आंबेडकर म्हणाले.

आम्ही तुमच्याबरोबर आहोत पण
देशातील लोक घराणेशाहीला उबगले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय घराणेशाहीवर वेळ खर्च करायचा नाही. त्यामुळे घराणेशाहीतील उमेदवार, विशिष्ट जातीचे उमेदवार देऊ नये. आम्ही त्यांचे मागे जाणार नाही, असेही आंबेडकरांनी सभेत ठणकावून सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube