Rahul Gandhi On Union Budget : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतरच पहिलाच अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांनी संसदेत यंदाच्या वर्षीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प पाहता एकूणच बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी अच्छे दिन आल्याचं म्हटलं जात आहे. याच मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते राहुल गांधी एनडीए सरकारवर चांगलेच संतापल्याचे दिसून आले आहेत. हा ‘खुर्ची बचाओ अर्थसंकल्प’ असा टोला राहुल गांधींनी लगावलायं. यासंदर्भातील पोस्ट राहुल गांधी यांनी एक्सवर शेअर केलीयं.
“Kursi Bachao” Budget.
– Appease Allies: Hollow promises to them at the cost of other states.
– Appease Cronies: Benefits to AA with no relief for the common Indian.
– Copy and Paste: Congress manifesto and previous budgets.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 23, 2024
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन कालपासून सुरु झालं. संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याआधी एक दिवस आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्याची परंपरा आहे. त्यानंतर आज निर्मला सीतारामण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केलायं. या अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामण यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.
अर्थसंकल्पामध्ये शेती, महिला, आरोग्य, रेल्वे विभाग, शहरी भाग, स्टॅम्प ड्यूटीबाबत घोषणा करण्यात आल्या आहेत. यासोबतच अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आंध्र प्रदेश राज्याच्या विकासाचा मुद्दा पुढे करत राज्याला तब्बल 50 हजार कोटी रुपयांच्या अर्थ सहाय्याची घोषणा केली. तर बिहार राज्यातील रस्ते प्रकल्पांसाठी 26 हजार कोटी रुपयांचं खास पॅकेज जाहीर केलंय. या पॅकेजच्या माध्यमातून बिहारच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे.
माझा मुलगा जागृत मनाच्या विषाणूने मारला गेला; एलॉन मस्कची ‘वेक माइंड व्हायरसवर’ संतप्त प्रिक्रिया
यंदाच्या अर्थसंकल्पावरुन राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट शेअर केलीयं. या पोस्टमध्ये गांधी यांनी मार्मिक टोला लगावलायं. गांधी पोस्टमध्ये म्हणाले, ‘खुर्ची बचाओ अर्थसंकल्प…मित्रपक्षांना खूष करण्यासाठीच..इतर राज्यांना फक्त पोकळ आश्वासनेच दिली, सर्वसामान्य भारतीयांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. काँग्रेसचा जाहीरनामा आणि मागील बजेट कॉपी पेस्ट’ केल्याचं राहुल गांधी यांनी पोस्टमध्ये म्हटलंय.
दरम्यान, केंद्रामध्ये भाजपला बहुमत नसून इतर पक्षांच्या मदतीने भाजपने केंद्रात एनडीए स्थापन केलंय. मित्रपक्षांकडून सत्ता स्थापन करण्यासाठी मदत करण्यात आल्याने या अर्थसंकल्पात भाजपकडून मित्रपक्षांची काळजी घेतल्याचं दिसून आलं आहे. एनडीए सरकारमध्ये टीडीपी आणि नितीश कुमार यांचा जेडीयू हे दोन मोठे साथीदार आहेत.