Download App

राहुल गांधींच्या लोकसभेतील भाषणांची देशभरात चर्चा; वाचा, कुणाचा आहे पडद्यामागील ‘आवाज’?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भाषणांची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. त्यांच्या भाषणाचे सभागृहातही कौतुक होत आहे.

  • Written By: Last Updated:

Rahul Gandhi Speech : सध्या लोकसभा जर कुणी गाजवली असेल तर ती विरोधी पक्षनेते (Rahul Gandhi) राहुल गांधी यांनी गाजवली आहे. सर्वत्र चर्चा असते ती राहुल गांधींच्या भाषणांची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. त्यांच्या भाषणाचं सभागृहातही कौतुक होत आहे. ते सतत त्यांच्याच शैलीत मोदी सरकारला अडचणीत आणत आहेत.

राजीव गांधी फाउंडेशनमध्ये किती SC- ST, राहुल गांधींच्या दाव्यावर अर्थमंत्र्यांनी दिला प्रत्युत्तर

राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. त्यामुळे ते सर्व विरोधी पक्षाच्या वतीने ते आपली बाजू मांडत आहेत. त्यांच्या भाषणात अनेक महत्वाचे मुद्ये असतात. त्यावर ते सराकरला चांगलं घेरतात. त्यामुळे आता चर्चा समोर यायला लागली आहे की राहुल गांधी यांचं नक्की भाषण कोण लिहून देत आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सने आपल्या रिपोर्टमध्ये राहुल गांधींच्या टीमबाबत मोठा खुलासा केला आहे. राहुल गांधींची प्रत्येक जबाबदारी पडद्यामागे कोण सांभाळतं?.

मल्लिकार्जुन खरगे हे सध्या काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी इंडिया आघाडीच्या स्थापनेमागे खर्गे हे एक प्रमुख आहेत. संसदेच्या अधिवेशनादरम्यान, ते त्यांच्या टीमच्या मदतीने विरोधी पक्षांची रणनीती ठरवत असतात. दरम्यान, आयसीआयसीआय बँकेचे माजी कर्मचारी अलंकार सवाई अनेक वर्षांपासून राहुल गांधींसोबत काम करत आहेत. ते राहुलं गांधींच्या प्रत्येक कामात लक्ष घालत असतात. राहुल गांधींना भेटण्याची वेळही त्यांच्याकडूनच घ्यावी लागते.

कौशल्य विद्यार्थी

बिहारमधील ऑक्सफर्ड पदवीधर असलेले कौशल विद्यार्थी हे राहुल गांधींबद्दल महत्वाची माहिती असणारे एक आहेत. 2019 मध्ये विद्यार्थी हे राहुल गांधींचे अधिकृत खाजगी सचिव होते. संसदेच्या अधिवेशनात किंवा प्रवासादरम्यान ते बहुतांशी राहुल गांधींसोबत दिसतात. राहुल गांधी आणि इतर राजकीय नेत्यांमध्ये काही काम असतील तर ते त्यामधील दुवा समले जातात. राहुल गांधींचं भाषण तयार करण्याचं कामही तेच करतात.

video: काळीज पिळवटून टाकणारी दृष्य; आम्हाला वाचवा, वायनाड भूस्खलन दुर्घटेतील लोकांची आर्त हाक

माजी एसपीजी अधिकारी केबी बायजू यांनी 2010 मध्ये नोकरी सोडली आणि राहुल गांधींच्या टीममध्ये सामील झाले. बायजू राहुल गांधींच्या संपूर्ण लॉजिस्टिक आणि प्रवासाबद्दल नियोजन करत असतात. तेच राहुल गांधींचा दौऱ्याची रुपरेषा ठरवत असतात. त्यांनी राहुल गांधींचा दौरा आखला आहे.

गौरव गोगोई

लोकसभेतील विरोधी पक्षाचे उपनेते गौरव गोगोई हे खासदार म्हणून पहिल्या कार्यकाळापासून गांधींच्या जवळचे आहेत. गोगोई हे आता संसदेतील काँग्रेसच्या प्रमुख आवाजांपैकी एक आहेत आणि त्यांना राहुल गांधींचा पाठिंबा आहे.

सॅम पित्रोदा

इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा हे अनेक दशकांपासून गांधी कुटुंबाच्या जवळचे आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर पित्रोदा यांनी अलीकडेच काँग्रेसच्या परराष्ट्र विभागाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. ते पुन्हा अध्यक्षपदी आले आहेत. पित्रोदा राहुल गांधींच्या परदेश दौऱ्याचं काम पाहत आहेत.

follow us