Download App

जातनिहाय जनगणनेला मोदी, संघाचा विरोध; PM मोदींच्या होमपीचवरुन राहुल गांधींची तोफ

जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरुन काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींसह संघावर सडकून टीका केलीयं.

Rahul Gandhi Speech At Congress session : गुजरातमधील अहमदाबादमध्ये काँग्रेसचं अधिवेशन (Congress) पार पडलं. गुजरातमध्ये तब्बल 64 वर्षांनी आज पुन्हा एकदा काँग्रेसचं अधिवेशन पार पडलंय. या अधिवेशनाला काँग्रेसच्या सर्व दिग्गज नेत्यांनी हजेरी लावत आपली ताकद दाखवून दिलीयं. अधिवेशनादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेलं भाषण चर्चेचं ठरलंय. गांधी यांनी पुन्हा एकदा जातिनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदींसह आरएसएसला टार्गेट केल्याचं दिसून आलंय.

New Aadhaar App : नवीन आधार ॲप लाँच, नेमकं कसं काम करणार? फायदा काय वाचा A टू Z माहिती

राहुल गांधी भाषणादरम्यान बोलताना म्हणाले, देशात दलित, अतिमागास, आदिवासी, अल्पसंख्य किती आहेत, त्यांचा विकास किती झालायं, याबाबत जाणून घेण्यासाठी आम्ही जातिनिहाय जनगणनेचा मुद्दा उचलला. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसने भूमिका मांडलीयं. आम्हाला जातनिहाय जनगणना करायची नाही, आम्हाला याबाबत जाणून घ्यायचं नाही, या शब्दांत मोदी आणि आरएसएसने विरोध केला असल्याचं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलंय.

महागाईने त्रस्त नागरिकांना RBI ने दिली गुडन्यूज; रेपोदरात कपात, होम लोनचा EMI कमी होणार

तसेच आम्ही तेलंगणामधून जातनिहाय जनगणनेसाठी एक पाऊल पुढं टाकलंय. तेलंगणामध्ये 90 टक्के आदिवासी, दलित, अल्पसंख्यांक आहेत. देशातील सहकार खात्यातून या समुदायाला काय मिळालंय, तेलंगणाच्या या बांधवांना काहीच मिळालेलं नाही. मालकांच्या यादीत एकही दलित आदिवासी तुम्हाला पाहायला मि्ळणार नाही. आम्हाला त्यांचा हक्क द्यायचा आहे, याची सुरुवात आम्ही तेलंगणा राज्यातून करत असल्याचं राहुल गांधी यांनी यावेळी नमूद केलंय.

रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू, रायगड प्रकरणात सुनिल तटकरे भडकले

जनगणनेचा कायदा आम्ही राज्यसभा लोकसभेत मंजूर करु…
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसने सांगितलंय की आम्ही जातनिहाय जनगणना करणार नाही. आम्हाला याबाबत माहिती करुन घ्यायची नाही.. देशातील गरीब, दलित आदिवासी अल्पसंख्यांच्या भागीदारीबाबत आम्हाला माहित करुन घ्यायचं नाही. भाजपला काय लपवायचं ते लपवू द्या पण आम्ही लोकसभा आणि राज्यसभेत कायदा मंजूर करुनच घेणार असल्याचं राहुल गांधींनी ठणकावून सांगितलंय.

follow us