Download App

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुन्हा मणिपूर दौऱ्यावर; गोळीबारातील प्रभावित लोकांची घेतली भेट

काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज पुन्हा एकदा मणिपूर दौऱ्यावर गेले आहेत. त्यांनी येथे गोळीबारातील घटनेचा आढावा घेतला.

Rahul Gandhi Manipur visits :  काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आज मणिपूर दौऱ्यावर आहेत. राज्यातील जिरीबाम जिल्ह्यातील गुलर्थल भागात आज पहाटे काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. राहुल गांधी यांनी जिरीबाममधील मदत शिबिरांना भेट दिली आणि जातीय हिंसाचारामुळे प्रभावित झालेल्या लोकांची भेट घेतली. (Manipur) या गोळीबाराबद्दल एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार बंदुकधारींनी पहाटे 3.30 च्या सुमारास गुलारथलच्या मीतेई भागाकडे अनेक वेळा गोळीबार केला. (Manipur) यानंतर सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिलं. दरम्यान, सकाळी सात वाजेपर्यंत गोळीबार सुरू होता. खबरदारी म्हणून आजूबाजूच्या परिसरात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. राज्य पोलिसांच्या बुलेटप्रूफ वाहनालाही यावेळी आग लागली.

फ्रान्समध्ये त्रिशंकू परिस्थिती; डाव्या पक्षांचा मोठा विजय, मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज फेल

follow us