Download App

लोकसभेला कोणत्या राज्यात किती जागा लढवायच्या? काँग्रेसचा गोपनीय अहवाल बाहेर! ‘इंडिया’त बिनसणार?

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये (Lok Sabha Election) काँग्रेसने (Congress) कोणत्या राज्यात किती जागांची मागणी केली पाहिजे, कोणत्या राज्यात किती जागांवर निवडणूक लढवली पाहिजे, याचा ‘अलायन्स कमिटीचा’ गोपनिय अहवाल बाहेर आला आहे. या अहवालात मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात अशा अनेक राज्यांमध्ये काँग्रेसला मोठ्या भावाच्या भूमिकेत राहायचे आहे, तर अनेक ठिकाणी मित्रपक्षांकडून समाधानकारक जागांची मागणी करायची असल्याचे दिसून येत आहे. (Congress Party’s confidential report on how many seats to contest in which Lok Sabha state is out)

लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निवडणुकीची आचारसहिंता जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या रिंगणात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएशी लढण्यासाठी विरोधी पक्षांसह काँग्रेसने इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. मात्र त्यांच्यासमोर इंडिया आघाडीच्या पक्षांना जागावाटप अंतिम करणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. हेच आव्हान पेलण्यासाठी काँग्रेसने अलायन्स समितीची स्थापना केली होती.

श्रीराम मंदिराचे आंदोलन 1947 मधील स्वातंत्र्य संग्रामापेक्षाही मोठे : विहिंप नेत्याची मुक्ताफळे

काँग्रेसला कोणत्या राज्यात किती जागा हव्या आहेत?

या समितीच्या अहवालानुसार, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, पंजाब, महाराष्ट्र ही अशी काही राज्ये आहेत जिथे जागा वाटप योग्य पद्धतीने व्हावे अशी काँग्रेसची इच्छा आहे. काँग्रेसला उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या 80 पैकी 15 ते 20 जागांवर निवडणूक लढवायची आहे. याशिवाय काँग्रेसला महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 16-20 जागा, बिहारमधील 40 जागांपैकी 4-8 जागा आणि पश्चिम बंगालमध्ये 42 जागांपैकी 6-10 जागा हव्या आहेत. तर झारखंडमध्ये लोकसभेच्या 14 पैकी 7 जागा, पंजाबमध्ये 13 पैकी 6, दिल्लीत 7 पैकी 3, तामिळनाडूमध्ये 39 पैकी 8, केरळ 20 पैकी 16 जागा आणि जम्मू-कश्मीरमध्ये काँग्रेसचे दोन जागांवर लक्ष आहे.

साध्या गोष्टींमध्येही नाविन्य आणतात… : सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्याकडून गुजरातींचे तोंडभरुन कौतुक

दरम्यान, काँग्रेसच्या या भुमिकेमुळे प्रादेशिक पक्षांची निराशा होण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये काँग्रेसशिवाय आरजेडी, जेडीयू आणि कम्युनिस्ट पक्ष आहेत. तर महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादीची समन्वयाची भूमिका घेत जागा वाटप करायचे आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस विरुद्ध तृणमूल काँग्रेस यांच्यात संघर्ष सुरू आहे. तृणमूलने काँग्रेसला राज्यात दोन जागांची ऑफर दिल्याचे बोलले जात आहे. तर पंजाब आणि दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्षात चर्चा होणे आवश्यक आहे.

follow us