श्रीराम मंदिराचे आंदोलन 1947 मधील स्वातंत्र्य संग्रामापेक्षाही मोठे : विहिंप नेत्याची मुक्ताफळे
अयोध्या : श्रीराम मंदिरासाठीचे आंदोलन हे 1947 मधील स्वातंत्र्य संग्रामापेक्षाही मोठे आंदोलन होते, असे वादग्रस्त विधान विश्व हिंदू परिषदेचे (Vishwa Hindu Parishad) नेते शरद शर्मा यांनी केले. या आंदोलनात लाखो लोकांनी आपले प्राण अर्पण केले, यामुळे 500 वर्षांनंतंर यश मिळाले आणि राम मंदिर उभे राहिले, असेही ते म्हणाले. ते एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते. (Vishwa Hindu Parishad (VHP) leader Sharad Sharma said that the agitation for the Ram Temple in Ayodhya was bigger than the movement for the country’s independence in 1947. )
येत्या 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी भाजप आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. देशातील विविध ठिकाणी राम मंदिर सोहळ्याचा ऐतिहासिक क्षण दिवाळी सणासारखाच साजरा करण्यात यावा, असे आवाहन भाजप नेत्यांकडून करण्यात आले आहे. त्यामुळे देशभरात येत्या 22 जानेवाारीला दिवे लावून हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहेत.
शिक्षण MBA पण, मूर्ती कलेतच शोधलं करिअर; मंदिर गर्भगृहासाठी मूर्ती कोरणारे अरुण योगीराज कोण ?
याच पार्श्वभूमीवर बोलताना शरद शर्मा म्हणाले, “राम मंदिरासाठीचा लढा हा स्वातंत्र्य लढ्यापेक्षा मोठा होता. कारण धर्म, संस्कृती आणि इतिहासाने जोडले गेलेले एका धर्माचे लोक यात सामील होते. त्यांनी हा लढा उत्तरार्धापर्यंत पोहचवला. यासाठी 500 वर्षे लागली, या काळात लाखो लोकांनी आपले प्राण दिले, त्यामुळे हा लढा 1947 पेक्षा मोठा लढा होता असे मानायला हरकत नाही, असेही त्यांनी मत व्यक्त केले.
“जे रामाचे भक्त आहेत, फक्त त्यांनाच आमंत्रण” : श्रीराम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी ठाकरे-राऊतांना फटकारले
मोदी मुर्तीला स्पर्श करतील आणि मी जयजयकार करीत टाळ्या वाजवत बसू का?
या सोहळ्यादरम्यान, राम मंदिराच्या गर्भगृहात मुख्य पुजारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. तर पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. मात्र यावरुनच शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यालाही जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. प्राणप्रतिष्ठेवेळी ते मुर्तीला स्पर्श करतील आणि मी जयजयकार करीत टाळ्या वाजवत बसू का? या शब्दांत शंकराचार्य निश्चलानंद यांनी संताप व्यक्त केला आहे.