Download App

नौ सौ चूहे खाकर, बिल्ली हज को चली! मल्लिकार्जून खर्गेंनी सरकारच्या वसुलीचा आकडाच सांगितला

नौ सौ चूहे खाकर, बिल्ली हज को चली, या शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंनी बचत उत्सवावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केलीयं.

Mallikarjun Kharge On Pm Narendra Modi : केंद्र सरकारकडून आजपासून देशभरात जीएसटीचे नवे धोरण लागू करण्यात आले आहे. या धोरणामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा मिळणार असून नागरिकांची अडीच कोटी रुपयांची बचत होणार असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm narendra modi) यांनी केला आहे. या दाव्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी नौ सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली, असं म्हणत सरकारच्या वसुलीचा आकडाच दाखवलायं. खर्गेंनी ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलायं.

केंद्र सरकारने आजपासून बचत उत्सवाची घोषणा केलीयं. या धोरणावर मल्लिकार्जून खर्गे यांनी सडकून टीका केलीयं. 2017 पासून जीएसटीच्या माध्यमातून सरकारने तब्बल 55 लाख कोटी रुपयांची वसुली केल्याचा दावा खर्गे यांनी केला आहे. त्यामुळे सरकारने उलट जनतेची माफी मागायला हवी, असेही ते म्हणाले आहेत.

PM Modi Speech : जीएसटी बचत महोत्सव ते स्वदेशीचा मंत्र ; PM मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे

नौ सौ चूहे खाकर, बिल्ली हज को चली!, असे म्हणत खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केलीयं. तसेच तुमच्या सरकारने काँग्रेसच्या सोप्या आणि कुशल जीएसटीऐवजी वेगवेगळ्या नऊ स्लॅबचा गब्बर सिंह ट्रक्स लावला आणि 8 वर्षांत 55 लाख कोटींहून अधिक वसुली केली असल्याचा दावाही खर्गे यांनी केलायं.

प्रतिकात्मक अंत्ययात्रा अन् श्वानाच्या गळ्यात फोटो; गोपीचंद पडळकरांविरोधात कोल्हापुरात निषेध आंदोलन

आता तुम्ही अडीच लाख कोटींच्या बचत उत्सवावर बोलत आहात. जनतेला खोलवर जखमा देऊन तात्पुरते बँडएड लावण्याच्या गप्पा मारत आहात. तुम्ही डाळ, तांदूळ, धान्य, पेन्सिल, पुस्तके, उपचार, शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर या सगळ्यांतून जीएसटी वसूल केला होता, हे जनता कधीच विसरणार नाही. तुमच्या सरकारने तर जनतेची माफी मागायला हवी, अशी टीका खर्गेंनी केलीयं.

तुझी चड्डी सुद्धा ठेवणार नाही! शिवाजी वाटेगावकरांचा गोपीचंद पडळकरांना सज्जड दम

काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?
जीएसटीमध्ये सुधारणा करण्याचा हा निर्णय आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. जीएसटी सुधारणांचा देशातील सर्व घटकांना फायदा होईल. पूर्वीची कर प्रणाली, जी विविध करांचे मिश्रण होती, त्यामुळे सामान्य नागरिकांचे नुकसान झाले. आम्ही सार्वजनिक हितासाठी आणि राष्ट्रीय हितासाठी जीएसटी लागू केला. आता देश डझनभर करांच्या ओझ्यातून मुक्त झाला आहे. ‘एक राष्ट्र, एक कर’ चे स्वप्न प्रत्यक्षात आले आहे.

follow us