Mallikarjun Kharge : सध्या देशाच्या राजकारणात डिलिमिटेशन विधेयक अर्थात परिसीमन विधेयकावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलंच रान पेटलंय. अशातच आता कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वपक्षीय बैठक बोलवण्यासाठी पत्र लिहिलंय. खर्गे यांनी सोशल मीडियावर पत्र शेअर केलंय.
My letter to the PM Modi, once again requesting him to convene an All Party Meeting to discuss the Government’s revise proposals on Delimitation etc.
All of March and April, 2026, I had been writing to Hon'ble Minister of Parliamentary Affairs requesting that the Union… pic.twitter.com/FidK3kDSek
— Mallikarjun Kharge (@kharge) July 16, 2026
मल्लिकार्जून खर्गे यांनी पत्रात लिहिलंय, मार्च आणि एप्रिल महिन्यांत डिलिमिटेशन विधेयक संदर्भातील प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. माध्यमांमधून माहिती समजलीयं की केंद्र सरकार पावसाळी अधिवेशनात 131 संशोधन विधेयकाचा प्रस्तावर ठेवणार आहे. डिलिमिटेशन विधेयकासह इतर बाबींवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावून संसदेत सादर करण्याआधी विधेयकाचे संशोधन करण्यासाठी वेळ द्यावा, अशी मागणी मल्लिकार्जून खर्गे यांनी केलीयं.
दरम्यान, संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु होण्याआधी देशाच्या राजकारणात काही महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. पावसाळी अधिवेशनात एक वेगळं चित्र पहायला मिळू शकतं. लोकसभेत मोदी सरकारचं दोन तृतीयांश बहुमताचं मिशन आणखी मजबूत होऊ शकतं. एप्रिल महिन्यात लोकसभेत हे विधेयक पडलं होतं. मोदी सरकारला दोन-तृतीयांश बहुमत जमवता आलं नव्हतं. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे सूर बदलले, तर सरकारच्या दोन तृतीयांश बहुमताच्या मिशनला बळकटी मिळेल. मतदारसंघ पुनर्रचना विधेयक सादर झाल्यानंतर आम्ही त्यावर निर्णय घेऊन असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
