Sunil Tatkare : पक्षात गैरसमज नाही, सुनेत्रा पवारांना सगळ्या गोष्टी सांगतो; सुनील तटकरे स्पष्ट बोलले
Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने
Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राज्यातील राजकराणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे या भेटीपूर्वी कल्पना न दिल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नाराज झाल्याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सर्वकाही ओके नसल्याची माहिती समोर येत आहे. तर आता या प्रकरणात पत्रकार परिषद घेत खासदार सुनील तटकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आमच्या पक्षात कुठलाही गैरसमज नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
माध्यमांशी बोलताना खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) म्हणाले की, आमच्या पक्षात कुठलाही गैरसमज नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत सध्या ज्या चर्चा सुरु आहेत त्या चुकीच्या आहेत. शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) आणि आमची भेट देखील झालेली नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे म्हणाले.
अजितदादा असताना विलीनीकरणाच्या चर्चा झाल्या
तर या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अजितदादा असताना दोन्ही राष्ट्रवादीच्या (NCP) विलीनीकरणाच्या चर्चा झाल्या होत्या मात्र अजितदादांच्या निधनानंतर विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम लागला. तसेच मी खासदार आहे. मुख्यमंत्र्यांची प्रत्येकवेळी होणारी भेट राजकीय असते असं नाही. मतदारसंघातील कामे देखील असतात. ज्यावेळी राजकीय बैठका असतात त्यावेळी सुनेत्रा पवार यांना त्याबाबत माहिती असते.
मी 40 वर्षे राजकारणात आहे. मला राजशिष्टाचार माहिती आहे. आम्ही सुनेत्रा पवारांना सगळ्या गोष्टी सांगतो असं देखील या पत्रकार परिषदेत बोलताना सुनील तटकरे म्हणाले.
तर दुसरीकडे या पत्रकरा परिषदेत बोलताना त्यांनी डिलिमिटेशन बिलालवर देखील भाष्य केले. या बिलाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा द्यावा, न द्यावा हा त्यांच्या प्रश्न आहे. सुप्रिया सुळे यांचं म्हणणं देखील मी ऐकलं आहे. डिलिमिटेशन बिलाला समर्थन करणं म्हणजे एनडीएसोबत आलं असं नाही असेही यावेळी सुनील तटकरे म्हणाले.