पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी जीवन संपवलं; व्हिडिओ बनवला अन् घेतलं माजी आमदार रविद्र धंगेकरांचं नाव

Ravindra Dhangekar : पुण्यातील व्यावसायिक खलील शेख यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. व्यावसायित खलील शेख माजी

Ravindra Dhangekar

Ravindra Dhangekar : पुण्यातील व्यावसायिक खलील शेख यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. व्यावसायित खलील शेख माजी आमदार रविंद्र धंगेकर यांच्या पत्नीसोबत व्यावसायिक भागिदारीत होते. वेगवेगळ्या व्यवहारांमध्ये कर्जबाजारी झाल्याने त्यांनी आत्महत्या केली असल्याचे आत्महत्येपूर्वी तयार केलेल्या व्हिडिओमध्ये खलील शेख यांनी म्हटलं आहे.

माहितीनुसार, माजी आमदार रविंद्र धंगेकरांच्या (Ravindra Dhangekar) पत्नी प्रतिभा धंगेकर (Pratibha Dhangekar) यांच्यासह आणखी चार भागिदारांची उत्कर्ष असोसिएट कंपनी पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील वक्फ बोर्डाच्या जमिनीवर बांधकाम करत होती. या कंपनीत खलील शेख यांच्यासह मनसेचे माजी नगरसेवक बाळा शेडगे (Bala Shedge) यांच देखील समावेश होता. वक्फ बोर्डाची जागेवर बांधकाम सुरु करण्यासाठी बँकांकडून कर्जे देखील घेण्यात आले होते मात्र या बांधकामाला वक्फ बोर्डाकडून स्थगिती मिळाल्यानंतर सदर प्रकरण न्यायालयात पोहोचल्याने बांधकाम सुरु होऊ शकलं नाही त्यामुळे कर्जबाजारी झालेल्या खलीलने राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्यापूर्वी तयार केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या करत असल्याचं म्हटलंय आहे. तसेच या व्हिडिओमध्ये माजी आमदार आर्थिक अडचणींकडे दुर्लक्ष करत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

आत्महत्यापूर्वी तयार केलेल्या व्हिडिओमध्ये नेमकं काय म्हणाले खलील शेख?

उत्कर्षा कंपनी याचे पार्टनर रविंद्र धंगेकर यांच्या पत्नी, बाळासाहेब शेडगेंच्या पत्नी, सुनील आहेरांचा मुलगा, हमीद शेखचा मुलगा आणि रघु गावडे हे स्वत: पार्टनर आहेत. पम माझं यांचे एक बिल घेतलेलं आहे त्याचे बिलाचे पेमेंट 20 लाख रुपये आहे परंतु ते दिलेले नाही आणि दोन बिलं यांनी घेतलेले नाहीत. अशा त्या दोन बिलाचे पेमेंट 15-15 लाख आहे. यांच्याकडून एकूण 50 लाख रुपये येणे आहे. मी तीन वर्षांनी ह्या 50 लाखांचे 4 टक्क्याने व्याज भरतोय. बाळासाहेब शेडगे माझे पैसे देत नाहीत. दादागिरी आणि भाईगिरी करत आहे. स्वत:ला खूप मोठा माणूस समजतोय. याच्यामुळे माझ्या मुलाला पण धोका होऊ शकतो आणि मुलाला मार्केटमध्ये काम करायला पण अडचण आणू शकतो.

मला पण दोन-चार वेळा त्याने धमकी देत फार त्रास दिला आहे. मार्केटमध्ये कुठेही काम करु देणार नाही. पुण्यात जगणं मुश्किल करेल अशा धमकल्या शेडगेंनी मला दिल्या. आज मी तर फाशी घेणारच आहे बाकी माझ्या लेकरा- बाळाला त्रास झाला तर यासाठी बाळासाहेब शेडगे आणि त्यांचा मुलगा जबाबदार असेल असं व्यावसायिक खलील शेख यांनी आत्महत्यापूर्वी तयार केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे.

जुलैच्या पावसाने खरीपाला दिला जीवदान; 70 टक्के पेरण्या पूर्ण-

रविंद्र धंगेकर काय म्हणाले?

कर्जजास्त झाल्यामुळे खलील शेख यांनी आत्महत्या केली. ही जागा वक्फची आहे असं आम्हाला पत्र आलं, प्रोजेक्ट थांबवा असं सांगण्यात आलं. मी अधिकाऱ्यांना सांगितलं की, तुम्ही जी कारवाई करताय याने अनेकजण आत्महत्या करतील त्यात मी सुद्धा असेल. वक्फ बोर्डाचा आणि त्या जागेता काही संबंध आता राहिला नाही. थांबलेल्या कामांमुळे हा प्रोजेक्ट ढासाळला असं माध्यमांशी बोलताना रविंद्र धंगेकर म्हणाले.

follow us