Download App

काँग्रेसचा राजघाटवर सत्याग्रह, प्रियंका गांधींचा भाजपवर हल्लाबोल

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केल्यानंतर भारतीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते आज देशभरात मोदी सरकारविरोधात निदर्शने करत आहेत. राजधानी दिल्लीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा महात्मा गांधींच्या समाधीसमोर सत्याग्रह (Congress satyagraha) होणार होता, पण दिल्ली पोलिसांनी त्याला परवानगी दिली नाही. यानंतर काँग्रेसने सत्याग्रहाची जागा बदलली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी गांधी स्मारकाबाहेर सत्याग्रह केला.

भाजपने गांधी कुटुंबाला बदनाम करून त्यांच्या काश्मिरी पंडित वंशाचा अपमान केल्याच्या आरोप काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी केला आहे. भाजपवर हल्लाबोल करताना शहीदांच्या मुलाचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्या म्हणाल्या की, राहुल गांधींसोबतच भाजपने गांधी-नेहरू कुटुंबालाही सोडले नाही. आज काँग्रेसने राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केल्याच्या विरोधात दिल्लीत निदर्शने केली. यावेळी प्रियंका गांधी यांनी भाजपवर टीका केली.

काँग्रेसकडून राजकारणासाठी आरक्षणाचा वापर; अमित शाहांचे काँग्रेसवर ताशेरे

महात्मा गांधी स्मारकावर काँग्रेसच्या सत्याग्रहाला पोलीसांनी परवानगी दिली नाही, त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी राजघाटाबाहेर सत्याग्रह केला. यावेळी प्रियंका गांधी म्हणाल्या, “तुम्ही माझ्या भाऊ शहीदाच्या मुलाला देशद्रोही आणि मीर जाफर म्हणता. तुम्ही त्याच्या आईचा अपमान करतात. तुमचे मुख्यमंत्री म्हणतात की, राहुल गांधींना त्यांची आई कोण आहे हे माहीत नाही. तुम्ही रोज माझ्या कुटुंबाचा अपमान करता पण गुन्हा दाखल होत नाही”.

त्या पुढं म्हणाल्या, “तुमचे पंतप्रधान संसदेत म्हणतात की हे कुटुंब नेहरू आडनाव का वापरत नाही. ते काश्मिरी पंडितांच्या संपूर्ण कुटुंबाचा अपमान करतात. वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाचे आडनाव पुढं ठेवण्याची प्रथा पाळणाऱ्या मुलांचाही अपमान करतात. नीरव मोदी, मेहुल चोक्सी आणि ललित मोदी ओबीसी आहेत का? ते भगोड़े आहेत.” अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे.

Tags

follow us