Download App

“सनातन धर्म डेंग्यू, मलेरियासारखा… तो नष्टच करायला हवा”; CM स्टॅलिन यांचे सुपुत्र अडचणीत

“सनातन धर्म हा डेंग्यू आणि मलेरिया सारखा आहे. याला केवळ विरोध करु नये तर तो संपवून टाकावा”, असं म्हणत तामिळनाडू सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी खळबळ उडवून दिली आहे. सनातन निर्मूलन परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन मोठा गदारोळ सुरु झाला असून भाजपमधून त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. याशिवाय त्यांच्याविरोधात दिल्लीत तक्रारही दाखल करण्यात आली आहे. (Controversy on statement given by Udhayanidhi Stalin, son of Tamil Nadu government minister and Chief Minister MK Stalin, regarding Sanatan Dharma)

उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविरोधात चिथावणीखोर, प्रक्षोभक आणि बदनामीकारक वक्तव्य केल्याचा दावा करत सर्वोच्च न्यायालयातीला वकील आणि सामाजिक कार्यकर्ते विनीत जिंदाल यांनी दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 120B, 153A, 295, आणि 504 आणि IT कायद्याच्या कलमांन्मवये त्यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

उदयनिधी स्टॅलिन म्हणाले की, सनातन हे संस्कृत नाव आहे. तर सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करता येत नाही, त्या संपवल्या पाहिजेत. आम्ही डेंग्यू, डास, मलेरिया किंवा कोरोनाला विरोध करू शकत नाही. ते नष्टच करुन टाकायचा आहे. तसेच सनातनलाही नष्ट करायचे आहे.

मध्य प्रदेशात भाजपला भलमोठं खिंडार, दोन आमदारांसह 10 नेत्यांचा पक्षाला रामराम, कॉंग्रेसमध्ये प्रवेश

स्टॅनिल यांच्या या वक्तव्यावर भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, उदयनिधी स्टॅलिन यांनी देशातील 80 टक्के लोकसंख्येचा नरसंहार करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सनातन धर्माचा संबंध मलेरिया आणि डेंग्यूशी जोडला. तसंच याला केवळ विरोध न करता तो संपवला पाहिजे, असे त्यांचे मत आहे. थोडक्यात तो सनातन धर्माचे पालन करणाऱ्या भारतातील 80 टक्के लोकसंख्येच्या नरसंहाराची हाक देत आहे. द्रमुक हा विरोधी आघाडीचा प्रमुख सदस्य आणि काँग्रेसचा दीर्घकालीन सहयोगी आहे. मुंबईच्या बैठकीत यावर एकमत झाले होते का?

One Nation One Election साठी मोदी सरकारकडून समिती स्थापन, रामनाथ कोविंद यांच्यासह ‘या’ नेत्यांचा समावेश?

मालविया यांच्या पोस्टनंतर उदयनिधी यांचा खुलासा

अमित मालवीय यांच्या सोशल मीडिया पोस्टनंतर उदयनिधी स्टॅलिन यांनी त्यांना प्रत्युत्तर देत सनातन धर्माच्या अनुयायांचा नरसंहाराचे वक्तव्य केले नसल्याचे म्हटले आहे. मात्र, उदयनिधी आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. मी सनातन धर्मामुळे त्रस्त असलेल्या उपेक्षित समाजाच्या वतीने बोलत आहे. माझ्या वक्तव्याबाबत मी कोणत्याही कायदेशीर आव्हानाला सामोरे जाण्यास तयार आहे. एमके स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुक सरकार सामाजिक न्याय राखण्यासाठी आणि समतावादी समाजाची स्थापना करण्यासाठी संघर्ष करत राहील. अशा भगव्या धमक्यांना घाबरणार नाही. आम्ही पेरियार, अण्णा आणि कलैगनार (करुणानिधी) यांचे अनुयायी आहोत आणि सामाजिक न्याय राखण्यासाठी नेहमीच लढा देऊ.

Tags

follow us