नवी दिल्ली : गेली दोन वर्षे जगात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्वकाही सुरळीत सुरु होते. मात्र आता पुन्हा एकदा चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना (Covid-19) पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे आकडेवारीतून दिसू लागले आहे. दरदिवशी कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने आरोग्य व्यवस्था पुन्हा एकदा अलर्ट मोडवर आली आहे. यामुळे येत्या काळात पुन्हा एकदा निर्बंध येणार का ? अशी परिस्थिती जणू निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे देशातील काही प्रमुख राज्यांमध्ये तसेच शहरामध्ये याचा प्रादुर्भाव वेगाने होऊ लागला आहे. यामध्ये प्रामुख्याने दिल्ली (Delhi) आणि मुंबई (Mumbai) यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य मंत्रालयाची चिंताही वाढली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आरोग्य विभागानं लोकांना मास्क वापरण्याचं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. यासोबतच लोकांना गर्दीची ठिकाणी जाणं टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. दिल्ली आणि मुंबईच्या गेल्या दहा दिवसांच्या आकडेवारीवरून, कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढत असल्याचं लक्षात येत आहे.
राऊत, फाऊत, दाऊद म्हणत Devendra Fadanvis यांची ठाकरे, राऊतांवर तुफान हल्ला
गेल्या 10 दिवसांत मुंबईत जवळपास दररोज 100 हून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. 3 एप्रिल रोजी देशाच्या आर्थिक राजधानीत 75 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. यापूर्वी 2 एप्रिल रोजी 172 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती.
ट्विटरच्या लोगोत बदल, चिमणी उडाली भुर्रर…आता ‘डॉगी’ दिसू लागला
दिल्लीत परिस्थिती चिंताजनक
दिल्लीत दररोज 400 हून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद केली जात आहे. 3 एप्रिल रोजी राजधानी दिल्लीत 293 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. यापूर्वी 2 एप्रिल रोजी 429 रुग्णांची नोंद करण्यात आली होती.