ट्विटरच्या लोगोत बदल, चिमणी उडाली भुर्रर…आता ‘डॉगी’ दिसू लागला

Untitled Design   2023 04 04T075253.354

नवी दिल्ली : ट्विटरची मालकी टेस्लाचे संस्थापक एलोन मस्क यांनी घेतल्यापासून ते सातत्याने यामध्ये काहींना काही बदल करत आहे. यापूर्वी त्यांनी ब्ल्यू टिकसाठी शुल्क ठेवले. विनाशुल्क ही सेवा बंद केली. हे सगळं सुरु असताना आजवर ट्विटरचे लोगो (TwitterLogo) असलेली चिमणी देखील आता गायब होणार आहे. कारण चिमणीची जागा आता डॉग घेणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. यावरून ट्विटर युझर्सने मस्क यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

ट्विटर म्हटले की हवेत उडणारी निळी चिमणी हा लोगो आजवर आपल्याला सर्वाना माहित होता. मात्र आता ट्विटरवरून निळा पक्षी गायब झाला आहे. कारण, ट्विटरने ‘डॉगी’ हा आपला नवा लोगो बनवला आहे. ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनीही यासंदर्भात एक ट्विट केले आहे, हा डॉगी ट्विटरचा नवीन लोगो असणार अशी आता सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे.

उद्धव ठाकरेंना दोन पक्षांच्या कुबड्या घेण्याची वेळ! भाजपने सभेस्थळी गौमूत्र शिंपडले…

मस्क यांचे ट्विटमध्ये नेमकं काय म्हंटले?
ट्विटरच्या वापरकर्त्यांनी सोमवारी ट्विटरच्या वेब आवृत्तीवर ‘Doge’ meme पाहिला. मस्क यांनी त्याच्या अकाऊंटवर एक पोस्ट देखील शेअर केली आहे, ज्यात एका कारमध्ये ‘डॉग’ बसलेला दिसत आहे. आणि एक पोलीस अधिकारी त्याचे लायसन्स घेतो आणि लायसन्सवर निळी चिमणी आहे. मात्र समोर डॉग आहे, तर यामध्ये असे म्हंटले की आता त्याचा फोटो बदलला आहे.

राऊत, फाऊत, दाऊद म्हणत Devendra Fadanvis यांची ठाकरे, राऊतांवर तुफान हल्ला

या लोगोच्या बदलानंतर एलन मस्क यांना अनेक युजर्सनी ट्रोल केलं आहे. काहींनी मजेशीर ट्विट आणि मीम्स तयार केले आहेत. सोमवारी रात्रीपासून यूजर्सना त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर निळ्या पक्ष्याऐवजी कुत्रा दिसू लागला. हा लोगो पाहून यूजर्स आश्चर्यचकित झाले.

Tags

follow us