country’s wealthiest entrepreneurial familes daily profit of over Four thousand crore earnings earnings breakdown : 2026 बार्कलेज प्रायवेट क्लाइंट्स हुरून इंडिया मोस्ट व्हॅल्यूएबल फॅमिला बिझिनेस लिस्टनुसार भारतातील 300 सर्वांच मौल्यवान उद्योजक घराण्यांच्या उद्योगांचे एकूण मूल्य हे 138 लाख कोटी रूपये इतके आहे. जी किंमत जगातील 18 व्या सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्थेच्या बरोबर आहे. जी नेदरलँड सौदी अरब, स्वित्झर्लंड आणि पोलंड सारख्या देशांच्या पुढे आहे.
शिंदेंच्या बैठकीत तुकाराम मुंढेंनी मांडला FDA चा रिपोर्ट; एकनाथ शिंदेंचे थेट आदेश
आश्चर्याची गोष्ट ही आहे की, या उद्योगांनी 2024 च्या उत्पन्नानंतर यात 30 लाख कोटी रूपयांची वाढ झाली आहे. जी गेल्या 2 वर्षांमध्ये दररोज 4 हजार 76 कोटी रूपये या किंमतीने वाढत आहे. तर 2024 नंतर या उद्योगांच्या उत्पन्नामध्ये 27.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. दुसरीकडे याच काळात निफ्टी 50 मध्ये1.1 टक्के आणि सेन्सेक्स 3.7 टक्क्यांनी कोसळला आहे. तरी देखील हे उद्योग आपेक्षेपेक्षा जास्त नफ्यात आहेत.
व्हर्जिन, 2 लाख पगार आणि परदेशवारीची अट; जोडीदारासाठीच्या अपेक्षांची पोस्ट व्हायरल
यामध्ये सर्वांत वरच्या स्थानावर आहे अंबानी कुटुंब रिलायन्स इंडस्ट्रीजमुळे या कुटुंबाचं मूल्य 25.82 लाख कोटी रूपये आहे. ज्यामध्ये गेल्या वर्षी 8.5 टक्क्यांची घट झाली होती. तरी देखील अंबानी कुटुंब या यादीमध्ये सर्वांत वरच्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर आहे. कुमार मंगलम् बिर्ला कुटुंबाचं मूल्य 8.14 लाख कोटी रूपये आहे. जे अंबानी कुटुंबाच्या एक तृतीयांशपेक्षा कमी आहे. बिर्ला कुटुंब दुसऱ्या स्थानावर आलं आहे कारण त्यांच्या कुटुंबाचं मूल्य 26 टक्क्यांनी वाढून 8.14 लाख कोटी झालं आहे. तर जिंदाल कुटुंब तिसऱ्या स्थानावर पोहचलं आहे. ज्यांचं मुलय 40 टक्क्यांनी वाढून 8.02 लाख कोटी रूपये झालं आहे.
शिंदेंच्या बैठकीत तुकाराम मुंढेंनी मांडला FDA चा रिपोर्ट; एकनाथ शिंदेंचे थेट आदेश
बजाज कुटुंब 7.7 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह चौथ्या स्थानावर आहे. मात्र, त्यांच्या संपत्तीच्या मूल्यात 3.9 टक्क्यांची घट झाली आहे. त्यानंतर महिंद्रा कुटुंबाचा क्रमांक लागतो. महिंद्रा कुटुंबाची संपत्ती 5.15 लाख कोटी रुपये असून, त्यांच्या संपत्तीत 5.4 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. दुसरीकडे, अनिल अग्रवाल कुटुंबाने या यादीत मोठी झेप घेतली आहे. वेदांता समूहातील पाच स्वतंत्र सूचीबद्ध कंपन्यांमध्ये झालेल्या विभागणीनंतर कुटुंबाच्या संपत्तीचे मूल्य 75 टक्क्यांनी वाढून 4.45 लाख कोटी रुपये झाले आहे. गेल्या तीन वर्षांचा विचार केला तर अग्रवाल कुटुंबाच्या संपत्तीत तब्बल 212 टक्क्यांची वाढ झाली आहे.
पहिल्या पिढीतील उद्योजकांची संपत्ती किती?
यंदाच्या अहवालातील महत्त्वाची बाब म्हणजे पहिल्या पिढीतील 100 कौटुंबिक व्यवसायांची स्वतंत्र क्रमवारी तयार करण्यात आली आहे. या व्यवसायांचे एकत्रित मूल्य 77.8 लाख कोटी रुपये इतके आहे. दोन्ही याद्या एकत्र केल्यास 400 व्यावसायिक कुटुंबांची एकूण संपत्ती 215.8 लाख कोटी रुपये होते. पहिल्या पिढीतील उद्योजकांच्या यादीत अदानी कुटुंब सर्वात पुढे आहे. अदानी कुटुंबाची संपत्ती 19.6 लाख कोटी रुपये इतकी आहे. भारती एअरटेलचे संस्थापक सुनील भारती मित्तल यांचे कुटुंब 12.1 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजचे दिलीप सांघवी कुटुंब 4.55 लाख कोटी रुपयांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाशी संबंधित पूनावाला कुटुंबाची संपत्ती 2.98 लाख कोटी रुपये असून ते चौथ्या क्रमांकावर आहे. तर एव्हेन्यू सुपरमार्ट्सशी संबंधित दमानी कुटुंब 2.86 लाख कोटी रुपयांसह पाचव्या स्थानावर आहे. हुरून इंडियाचे संस्थापक आणि मुख्य संशोधक अनस रहमान जुनैद यांच्या मते, केवळ आज किती संपत्ती आहे हे महत्त्वाचे नसून नवी संपत्ती नेमकी कुठे आणि कोण निर्माण करत आहे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. पहिल्या पिढीतील उद्योजक आता देशातील संपत्ती निर्माण करण्याच्या प्रक्रियेत आघाडीवर येत आहेत. त्यांच्या मते, किमान 1 अब्ज डॉलर किंवा त्याहून अधिक संपत्ती असलेल्या कुटुंबांची संख्या एका वर्षात 48 टक्क्यांनी वाढून 230 झाली आहे.
अब्जावधी डॉलरची संपत्ती असलेली 230 कुटुंब
भारतात अब्जाधीश कौटुंबिक व्यवसायांची संख्या वेगाने वाढत असल्याचे अहवालातून समोर आले आहे. सध्या 230 कुटुंबांकडे किमान 1 अब्ज डॉलरची संपत्ती आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही संख्या 48 टक्क्यांनी अधिक आहे. बार्कलेज प्रायव्हेट बँकेचे भारत प्रमुख अद्रिश घोष यांच्या मते, वारसा नियोजन, व्यवसायातील कारभाराची पद्धत, फॅमिली ऑफिसची रचना, पैशांची उपलब्धता आणि जागतिक स्तरावर व्यवसायाचा विस्तार यांसारखे विषय व्यावसायिक कुटुंबांसाठी दिवसेंदिवस अधिक महत्त्वाचे ठरत आहेत.
अहवालानुसार, पहिल्या 300 कुटुंबांपैकी 79 कुटुंबे फॅमिली ऑफिस चालवतात. विशेष म्हणजे पहिल्या पिढीतील 36 टक्के कुटुंबांनीही अशा प्रकारची व्यवस्था उभारली आहे. यावरून फॅमिली ऑफिस ही संकल्पना आता केवळ जुन्या आणि मोठ्या औद्योगिक घराण्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही. नव्या पिढीतील उद्योजकही संपत्तीचे व्यवस्थापन, गुंतवणूक आणि व्यवसायाच्या पुढील पिढीकडे हस्तांतरणासाठी अशा व्यवस्थेचा वापर करत आहेत.
मुंबई अजूनही कौटुंबिक उद्योगांचे प्रमुख केंद्र
भारतातील मोठ्या कौटुंबिक उद्योगांच्या मुख्यालयांच्या बाबतीत मुंबईचे वर्चस्व कायम आहे. या यादीतील 95 कंपन्यांचे मुख्यालय मुंबईत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यामध्ये चार कंपन्यांची वाढ झाली आहे. मुंबईनंतर राष्ट्रीय राजधानी क्षेत्र अर्थात NCRमध्ये 58 कंपन्या, तर कोलकात्यात 26 कंपन्या आहेत. संपूर्ण यादीत देशातील एकूण 45 शहरांचा समावेश आहे. मात्र, नव्या संपत्तीची भौगोलिक व्याप्ती बदलत असल्याचेही अहवालातून स्पष्ट होते. हैदराबादमध्ये पहिल्या पिढीतील 15 कंपन्या आहेत, तर पारंपरिक कौटुंबिक व्यवसायांची संख्या नऊ आहे. मुंबईत पहिल्या पिढीतील 24 कंपन्या असून NCRमध्ये अशा 18 कंपन्या आहेत. अहवालात छत्रपती संभाजीनगर आणि त्रिशूर या शहरांचाही विशेष उल्लेख करण्यात आला आहे. या शहरांमध्ये पहिल्या पिढीतील व्यवसायांची संख्या पारंपरिक कौटुंबिक उद्योगांपेक्षा अधिक आहे.
कोणते उद्योग सर्वाधिक संपत्ती निर्माण करत आहेत?
संपूर्ण यादीचा विचार केला तर ‘इंडस्ट्रियल प्रॉडक्ट्स’ क्षेत्रातील कंपन्यांची संख्या सर्वाधिक आहे. या क्षेत्रातील 47 कंपन्यांचा समावेश आहे. त्यानंतर ऑटोमोबाइल आणि ऑटो कॉम्पोनंट्स तसेच केमिकल्स या दोन क्षेत्रांचा क्रमांक लागतो. या दोन्ही क्षेत्रांमध्ये प्रत्येकी 31 कंपन्या आहेत. मात्र, सरासरी संपत्तीच्या बाबतीत मेटल्स आणि मायनिंग क्षेत्र आघाडीवर आहे. या क्षेत्रातील कौटुंबिक व्यवसायांची सरासरी किंमत तब्बल 84,019 कोटी रुपये आहे. त्याच्या तुलनेत फूड आणि बेव्हरेज क्षेत्रातील कंपन्यांची सरासरी संपत्ती 12,714 कोटी रुपये आहे. पहिल्या पिढीतील व्यवसायांमध्ये फार्मास्युटिकल्स क्षेत्राचे महत्त्व विशेष आहे. या क्षेत्रातील 22 कंपन्यांची सरासरी संपत्ती 74,218 कोटी रुपये आहे. इंडस्ट्रियल प्रॉडक्ट्स क्षेत्रात पहिल्या पिढीतील 10 व्यवसाय आहेत. ऑटोमोबाइल आणि ऑटो कॉम्पोनंट्स तसेच रिअल इस्टेट क्षेत्रात प्रत्येकी नऊ व्यवसाय आहेत.
या आकडेवारीवरून भारतात नवी संपत्ती निर्माण होण्याचे क्षेत्र केवळ तंत्रज्ञान किंवा ग्राहककेंद्रित व्यवसायांपुरते मर्यादित नसल्याचे स्पष्ट होते. फार्मास्युटिकल्स, उत्पादन, धातू, औद्योगिक उत्पादने आणि रिअल इस्टेट यांसारखे पारंपरिक उद्योगही मोठ्या प्रमाणावर संपत्ती निर्माण करत आहेत. एकूण संपत्तीच्या बाबतीत अंबानी कुटुंबाचे वर्चस्व असले, तरी काही तुलनेने लहान व्यवसायांनी मागील काही वर्षांत अत्यंत वेगाने प्रगती केली आहे. ‘शाही एक्सपोर्ट्स’शी संबंधित आहुजा कुटुंबाच्या संपत्तीत तीन वर्षांत सर्वाधिक वाढ झाली आहे. त्यांच्या संपत्तीचे मूल्य 352 टक्क्यांनी वाढून 37,500 कोटी रुपये झाले आहे.
‘गरवारे हाय-टेक फिल्म्स’शी संबंधित शशिकांत भालचंद्र गरवारे कुटुंबानेही मोठी झेप घेतली. मागील तीन वर्षांत त्यांनी क्रमवारीत 61 स्थानांची प्रगती केली असून, त्यांच्या संपत्तीत 300 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती 15,600 कोटी रुपये झाली आहे. अहवालानुसार, कंपनीने जास्त नफा देणाऱ्या स्पेशालिटी फिल्म्सच्या व्यवसायावर अधिक लक्ष केंद्रित केले. आर्थिक वर्ष 2023 नंतर कंपनीच्या नफ्यात 100 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. मागील तीन वर्षांत 25 कुटुंबांनी आपली संपत्ती दुप्पटपेक्षा जास्त केली आहे.
एकूण रकमेत सर्वाधिक संपत्ती निर्माण करणाऱ्या कुटुंबांमध्ये जिंदल कुटुंब आघाडीवर आहे. तीन वर्षांत त्यांच्या संपत्तीत 3.3 लाख कोटी रुपयांची भर पडली असून, एकूण संपत्ती 8.02 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. अनिल अग्रवाल कुटुंबाने याच कालावधीत 3.03 लाख कोटी रुपये, तर कुमार मंगलम बिर्ला कुटुंबाने 2.75 लाख कोटी रुपयांची संपत्ती वाढवली.
मात्र, संपत्ती वाढीचे चित्र सर्वच व्यावसायिक कुटुंबांसाठी सकारात्मक राहिलेले नाही. HCL टेक्नॉलॉजीजशी संबंधित नाडर कुटुंबाच्या संपत्तीत मागील तीन वर्षांत सर्वाधिक घट झाली आहे. नाडर कुटुंबाची संपत्ती 32 टक्क्यांनी म्हणजेच 1.39 लाख कोटी रुपयांनी कमी झाली. त्यानंतर राजीव सिंह कुटुंबाच्या संपत्तीत 25 टक्क्यांची घट झाली. सॉफ्टवेअर आणि सर्व्हिसेस तसेच रिअल इस्टेट या क्षेत्रांमध्ये संपत्ती घटण्याचे प्रमाण तुलनेने अधिक राहिले. नव्या क्रमवारीनुसार नाडर कुटुंबाची संपत्ती 2.91 लाख कोटी रुपये आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यात 38 टक्क्यांची घट झाली आहे. दुसरीकडे, प्रेमजी कुटुंबाची संपत्ती 2.72 लाख कोटी रुपये असून, त्यात 2.3 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे.
भारताच्या अर्थव्यवस्थेत कौटुंबिक व्यवसायांचे योगदान केवळ संपत्तीपुरते मर्यादित नाही. या यादीतील 300 कुटुंबांच्या व्यवसायांमधून मिळून 54 लाखांहून अधिक लोकांना रोजगार मिळतो. या व्यवसायांची एकत्रित कमाई जवळपास 56 लाख कोटी रुपये आहे, तर त्यांचा निव्वळ नफा सुमारे 5.6 लाख कोटी रुपये आहे. त्यामुळे या व्यवसायांचा एकूण निव्वळ नफा मार्जिन जवळपास 10 टक्के आहे.
या कंपन्यांनी कराच्या माध्यमातून सरकारला जवळपास 1.9 लाख कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. ही रक्कम भारताच्या एकूण कॉर्पोरेट करसंकलनाच्या सुमारे 17 टक्के आहे. त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेत कौटुंबिक मालकीच्या व्यवसायांचे महत्त्व किती मोठे आहे, हे स्पष्ट होते. या कुटुंबांची संपत्ती केवळ वैयक्तिक गुंतवणुकीच्या स्वरूपात नसून, मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करणाऱ्या आणि सरकारला कर महसूल देणाऱ्या कार्यरत कंपन्यांमध्ये गुंतलेली आहे.
मोठ्या कौटुंबिक व्यवसायांच्या नेतृत्वात महिलांचा सहभाग अजूनही तुलनेने कमी आहे. मात्र, त्यांची उपस्थिती हळूहळू वाढत असल्याचे या अहवालातून दिसते. यादीतील 18 कंपन्यांचे नेतृत्व महिलांकडे आहे. हिंदुस्तान झिंकच्या प्रिया अग्रवाल हेब्बार या सर्वाधिक मूल्य असलेल्या महिला-नेतृत्वाखालील कंपनीचे नेतृत्व करतात. त्यांच्या नेतृत्वाखालील कंपनीचे मूल्य 4.45 लाख कोटी रुपये आहे. यानंतर HCL टेक्नॉलॉजीजच्या रोशनी नाडर मल्होत्रा यांचा क्रमांक लागतो. त्यांच्या कंपनीचे मूल्य 2.91 लाख कोटी रुपये आहे.
FSN ई-कॉमर्स व्हेंचर्सच्या फाल्गुनी नायर या पहिल्या पिढीतील व्यवसायाचे नेतृत्व करणाऱ्या यादीतील एकमेव महिला उद्योजक आहेत. अहवालात CRI Pumpsचाही उल्लेख करण्यात आला आहे. या कंपनीच्या व्यवसायाशी संबंधित कुटुंबातील सदस्यांमध्ये तब्बल सात महिलांचा सहभाग आहे. एकूणच, भारतातील कौटुंबिक व्यवसायांचे चित्र झपाट्याने बदलत आहे. पारंपरिक औद्योगिक घराण्यांचे वर्चस्व कायम असतानाच नव्या पिढीतील उद्योजक वेगाने मोठी संपत्ती निर्माण करत आहेत. त्याचवेळी व्यवसायाचे व्यवस्थापन, फॅमिली ऑफिस, जागतिक विस्तार आणि महिलांचा नेतृत्वातील सहभाग यांसारखे मुद्देही भविष्यातील कौटुंबिक उद्योगांच्या वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
