Download App

असाल तुम्ही कमल हसन पण…; तामिळ भाषेच्या मुद्द्यावरून कोर्टानं अभिनेत्याला झाप-झाप झापलं

Kamal Haasan : गेल्याकाही दिवसांपासून सुपरस्टार अभिनेता कमल हसन कन्नड - तमिळ भाषेच्या वादामुळे सोशल मीडियावर चर्चेत असून आज या प्रकरणात

Kamal Haasan : गेल्याकाही दिवसांपासून सुपरस्टार अभिनेता कमल हसन कन्नड – तमिळ भाषेच्या वादामुळे सोशल मीडियावर चर्चेत असून आज या प्रकरणात त्यांना कर्नाटका उच्च न्यायालयाने (Karnataka High Court) फटकारले आहे. या प्रकरणात आज झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने स्पष्ट केले की, कोणीही असो, जनतेच्या भावना दुखावण्याचा कोणालाही अधिकार नाही असं न्यायालयाने म्हटले आहे.

कमल हसन (Kamal Haasan) यांच्या आगामी ‘ठग लाईफ इन कर्नाटक’ (Thug Life in Karnataka) या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याच्या अपीलविरुद्ध कर्नाटका उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

या सुनावणी दरम्यान न्यायाधीश नागाप्रसन्ना म्हणाले की, कोणत्याही नागरिकाला भावना दुखावण्याचा अधिकार नाही. पाणी, नीळ आणि पाणी या तीन गोष्टी नागरिकांसाठी आवश्यक आहेत. भाषेच्या आधारावर या देशाचे विभाजन झाले आहे. जर एखाद्या सार्वजनिक व्यक्तीने अशी विधाने केली तर कोणतीही भाषा इतर कोणत्याही भाषेतून उद्भवलेली नाही. यामुळे जे घडले त्यातून वातावरण बिघडणार आणि कर्नाटकातील लोकांना तुमच्याकडून काय हवे होते फक्त माफी. असं सुनावणी दरम्यान न्यायाधीश नागाप्रसन्ना म्हणाले.

पुढे न्यायाधीश नागाप्रसन्ना म्हणाले की, ही परिस्थिती कमल हसन यांनी निर्माण केली आहे आणि के म्हणतात की, माफी नाही मागणार. तुम्ही कर्नाटकातील लोकांच्या भावना दुखावल्या आहेत पण कोणत्या आधारावर. तुम्ही इतिहासकार आहे का? तुम्ही भाषेचे तज्ज्ञ आहाक का? असं देखील यावेळी न्यायाधीश नागाप्रसन्ना म्हणाले.

‘सैयारा’ माझ्या पाच वर्षांतील संकलित गाणी, विचार आणि सूर आहेत!’ : मोहित सूरी

आता तुम्ही आर्थिक हितासाठी येथे आला आहात की पोलिसांनी तुमच्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला सुरक्षा पुरवावी. माफी मागितल्याने ते सोडवता आले असते. आम्ही कायद्याचा विचार करू, पण वृत्ती पहा. असेही यावेळी न्यायाधीश म्हणाले.

follow us