‘सैयारा’ माझ्या पाच वर्षांतील संकलित गाणी, विचार आणि सूर आहेत!’ : मोहित सूरी

Saiyara Songs : टिझर रिलीज पासून यशराज फिल्म्स (YRF) निर्मित आणि मोहित सूरी दिग्दर्शित ‘सैयारा’ ही 2025 मधील सर्वाधिक प्रतीक्षित रोमँटिक चित्रपटांपैकी एक बनली आहे. लव्ह स्टोरी सांगण्यात माहिर असलेल्या सैयारा (Saiyara) आणि मोहित या दोघांची जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नवोदित कलाकारांच्या जबरदस्त केमिस्ट्रीमुळे चित्रपटाची आधीच खूप वाहवा होत आहे.
सैयाराने आज चित्रपटाचा टायटल ट्रॅक ‘सैयारा’ रिलीज केला असून, मोहित सूरी (Mohit Suri) यांनी सांगितले की, “या अल्बममध्ये गेल्या पाच वर्षांत मी जपून ठेवलेली गाणी, सूर आणि विचार आहेत.” मोहित म्हणाला , “माझ्याबद्दल फारच मोजक्या मित्रांना माहिती आहे की, मला नवीन संगीतकार, गायक यांच्याशी भेटायला आवडतं… आणि त्यांच्याकडून सूर गोळा करणं म्हणजे काहीसं पुस्तकं गोळा करण्यासारखं आहे.
‘सैयारा’ अल्बममध्ये माझ्या गेल्या पाच वर्षांतील मेहनतीचं आणि संग्रहाचं प्रतिबिंब आहे.” मोहित म्हणतो की त्यांनी प्रेक्षकांसाठी एक अत्यंत फ्रेश आणि आत्म्याला भिडणारा अल्बम तयार करायचा होता.
तो पुढे म्हणतो, “मी एक नवीन कलाकारांच्या चित्रपटासाठी एक अत्यंत फ्रेश रोमँटिक अल्बम बनवू इच्छित होतो. ‘सैयारा’ अल्बम माझ्या मनाच्या खूप जवळचं आहे. त्यामुळे या अल्बममधलं प्रत्येक गाणं माझ्यासाठी खूप खास आहे. आमच्या प्रमोशनची सुरुवात ‘सैयारा’ या टायटल ट्रॅकपासून करतो आहोत. या गाण्यात इतकं प्रेम, उत्कटता आणि भावना आहे की मी त्याचं पहिल्याच ऐकण्यात प्रेमात पडलो.”
‘सैयारा’ च्या टायटल ट्रॅकसह दोन काश्मिरी संगीतकारांची बॉलिवूडमध्ये धमाकेदार एंट्री होणार आहे. मोहित सूरी सांगतो, “फहीम अब्दुल्ला आणि अर्सलान निजामी या दोन अत्यंत टॅलेंटेड काश्मिरी संगीतकार आणि गायक यांना आम्ही या गाण्यातून लॉन्च करत आहोत. हे गाणं तनिष्क बागची यांनी संगीतबद्ध केलं आहे, आणि मी त्यांचे आभार मानतो कारण त्यांनी मला फहीम आणि अर्सलान यांच्याशी ओळख करून दिली.
गाण्याचे सुंदर शब्द इरशाद कामिल यांनी लिहिले आहेत.” तो म्हणाला, “या गाण्यावर काम करणाऱ्या सर्व कलाकारांचा अनुभव जबरदस्त आहे. आम्हाला आशा आहे की हे प्रेमगीत प्रेक्षकांच्या मनात दीर्घकाळ टिकून राहील.” ‘सैयारा’ चित्रपटातून अहान पांडे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.
मेसेजिंग, पेमेंट अन् डेटिंग होणार एकत्र, Elon Musk लॉन्च करणार XChat; जाणून घ्या भन्नाट फीचर्स
यात अनीत पड्डा मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार असून, तिने ‘बिग गर्ल्स डोन्ट क्राय’ या मालिकेत आपल्या अभिनयाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. हा चित्रपट कंपनीचे सीईओ अक्षय विधानी यांनी निर्मित असून 18 जुलै 2025 रोजी हा चित्रपट जागतिक स्तरावर प्रदर्शित होणार आहे.