Indian 2: अरेरे, रिलीज होताच ऑनलाइन लीक झाला Indian 2… या साइटवरून केला भराभर डाउनलोड

Indian 2: अरेरे, रिलीज होताच ऑनलाइन लीक झाला Indian 2… या साइटवरून केला भराभर डाउनलोड

Indian 2 Movie Leaked Online: कमल हसनचा (Kamal Haasan) चित्रपट ‘इंडियन 2’ (Indian 2 Movie) काही काळापूर्वी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. रिलीजपूर्वी निर्मात्यांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. पण चित्रपटगृहात फ्लॉप झाल्याने निर्मात्यांच्या सर्व आशा धुळीला मिळाल्या. यानंतर निर्मात्यांनी ओटीटीवर (OTT) रिलीज करण्याचा विचार केला. ओटीटीवर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता निर्मात्यांसाठी एक वाईट बातमी येत आहे. ‘इंडियन 2’ (Indian 2) OTT वर येताच रिलीज झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kamal Haasan (@ikamalhaasan)


‘इंडियन 2’ ओटीटीवर लीक

एस शंकर दिग्दर्शित आणि बी जेयामोहन, काबिलन वैरामुथू आणि लक्ष्मी सरवना कुमार यांनी सह-लेखित केलेला ‘इंडियन 2’ 12 जुलै रोजी ‘इंडियन 2: झिरो टॉलरन्स’ या शीर्षकाखाली थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. इंडियन 2 हा 1996 च्या इंडियनचा सिक्वेल आहे जो 9 ऑगस्टपासून नेटफ्लिक्सवर तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध असेल.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाल्यानंतर काही तासांतच ‘इंडियन 2’ चित्रपट पायरसीचा बळी ठरला. शंकर दिग्दर्शित हा चित्रपट पायरेटेड वेबसाइट्सच्या माध्यमातून बेकायदेशीर शेअरिंगचा बळी ठरला आहे. लीक झाल्यानंतर चित्रपट ओटीटीवर ट्रेंड करत आहे, ज्यामुळे लोक ते विनामूल्य डाउनलोड करत आहेत. कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने 250 कोटींच्या बजेटसह जगभरात 147 कोटींची कमाई केली होती.

कमल हसन यांचा फ्लॉप चित्रपट ‘इंडियन 2’ आता ओटीटी होणार प्रदर्शित; कधी, कुठे जाणून घ्या…

कमल हसन वर्कफ्रंट

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर इंडियन 2 च्या आधी, कमल हासन कल्की 2898 AD या चित्रपटात दिसला होता. यानंतर कमल हासन ठग लाईफमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन चित्रपट निर्माते मणिरत्नम करत आहेत. ठग लाइफमधील कमल हासनचा लूकही समोर आला आहे, जो लोकांना खूप आवडला आहे. हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस थिएटरमध्ये प्रदर्शित होऊ शकतो.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube