Download App

Fengal Cyclone : सावधान, ‘फेंगल’ चक्रीवादळ येत आहे, 13 उड्डाणे रद्द, रेड अलर्ट जारी

Fengal Cyclone  : भारतीय हवामान विभागाने शनिवारी चेन्नई, तिरुवल्लूर, चेंगलपट्टू, कांचीपुरम, विल्लुपुरममध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त

  • Written By: Last Updated:

Fengal Cyclone : भारतीय हवामान विभागाने शनिवारी चेन्नई, तिरुवल्लूर, चेंगलपट्टू, कांचीपुरम, विल्लुपुरममध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान विभागाने (IMD Alert) दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राने चक्रीवादळाचे रूप धारण केले आहे आणि त्यामुळे तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या किनारपट्टीवर ‘फेंगल’ चक्रीवादळाचा (Fengal Cyclone) धोका वाढला आहे.

माहितीनुसार, हे वादळ शनिवारी दुपारपर्यंत उत्तर तामिळनाडू-पुडुचेरी किनारपट्टीवर कराईकल आणि महाबलीपुरम दरम्यान ताशी 70-80 किमी वेगाने धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे चेन्नईला जाणारी आणि13 उड्डाणे रद्द करण्यात आली. याशिवाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांचा तिरुवरूर केंद्रीय विद्यापीठाचा दौराही रद्द करण्यात आला आहे.

मुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, फेंगल चक्रीवादळामुळे चेन्नई, तिरुवल्लूर, चेंगलपट्टू, कांचीपुरम, विल्लुपुरम, कल्लाकुरीची, कुड्डालोर आणि पुद्दुचेरी जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी आणि अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने या भागांसाठी रेड अलर्ट जारी केले आहे. तसेच रानीपेट, तिरुवन्नमलाई, वेल्लोर, पेरांबलूर, अरियालूर, तंजावूर, तिरुवरूर, मायिलादुथुराई आणि नागापट्टिनम जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.

प्रशासन तयारीत व्यस्त

फेंगल चक्रीवादळाचा धोका वाढल्याने तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली आहे.  तामिळनाडू आपत्ती व्यवस्थापन विभागाने 2,229 मदत केंद्रे स्थापन केली आहेत. तिरुवरूर आणि नागापट्टिनम जिल्ह्यातील 164 कुटुंबांतील 471 लोकांना आधीच मदत शिबिरांमध्ये हलवण्यात आले आहे.

निवडणुकीतील पराभवामुळे विरोधक संतापले म्हणून …, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

फेंगल चक्रीवादळ सध्या पुद्दुचेरीपासून 350 किमी दक्षिण-पूर्वेस आहे. तो शनिवारी कराईकल आणि महाबलीपुरम दरम्यानच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. जोरदार वाऱ्यांमुळे किनारी भागात समुद्रात उंच लाटा उसळतील, ज्यामुळे जनजीवन प्रभावित होऊ शकते. सध्या प्रशासन आणि मदत संस्था परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि किनारी भागातील रहिवाशांना सतर्क राहण्याचा सल्ला भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

follow us