Download App

Cyclone Mocha : बंगालच्या उपसागरात ‘मोचा’ चक्रीवादळ धडकणार…

बंगालच्या उपसागरातील संभाव्य चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनारीच्या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. यासंदर्भात ओडीशा सरकारडून निर्देश देण्यात आले आहेत. 9 मे रोजी मोचा चक्रीवादळ येणार असल्याचे संकेत हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंजय महापात्रा यांनी दिले आहेत.

सुप्रिया सुळे अध्यक्ष होणार का ? ; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने दिलं नेमकं उत्तर

6 मे रोजी दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. 7 मे रोजी कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्‍यता आहे. 8 मे रोजी आग्नेय बंगालच्या उपसागरावर एक दबाव म्हणून केंद्रीत होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर, मध्य बंगालच्या उपसागराच्या दिशेने जवळजवळ उत्तरेकडे सरकत 9 मे रोजी ते चक्रीवादळात तीव्र होण्याची दाट शक्यता आहे.

Manobala passed away : ज्येष्ठ दिग्दर्शक अभिनेता मनोबाला यांचे वयाच्या 69 व्या वर्षी निधन

या चक्रीवादळाचा वेग आणि तीव्रता 7 मे रोजी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानंतरच सांगता येईल. त्यानंतरच याबाबत अचूक माहिती देता येईल. डीजी महापात्रा म्हणाले की, उन्हाळी चक्रीवादळांच्या मार्गाचा अंदाज लावणे खूप कठीण आहे. ते पुढे म्हणाले की, यासाठी हवामान विभागाकडून सातत्याने यंत्रणेवर लक्ष ठेवले जात असून नियमितपणे निरीक्षण केले जात आहे.

संजय राऊतांनी आमच्या पक्षात चोंबडेगिरी करू नये; नाना पटोलेंचा हल्लाबोल

दरम्यान, या चक्रीवादळाचा वेग आणि तीव्रता 7 मे रोजी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. उन्हाळी चक्रीवादळांच्या मार्गाचा अंदाज लावणे खूप कठीण असून यासाठी हवामान विभागाकडून सातत्याने यंत्रणेवर लक्ष ठेवले जात आहे. सोबतच नियमितपणे निरीक्षण केले जात असल्याचं डीजी महापात्रा यांनी सांगितलं आहे.

समुद्र किनारी असलेल्या मच्छीमार, जहाजे, बोटींना 7 मे पासून बंगालच्या उपसागराच्या दिशेने प्रवास न करण्याचा सल्ला आएमडीकडून देण्यात आला आहे.

Tags

follow us