Jagdish Devda : मंत्री विजय शाह (Vijay Shah यांच्यानंतर आता मध्यप्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा (Jagdish Devda) यांनी एक वादग्रस्त विधान केलं. संपूर्ण देश, सैनिक आणि देशाचे सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक आहे, असं विधान त्यांनी केलं. त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटीझन्सकडून संताप व्यक्त केला जात आहे.
बालवाड्मय वाचायचं माझं वय नाही, ‘नरकातील स्वर्ग’ पुस्करावरुन CM फडणवीसांचा राऊतांना टोला
जगदीश देवडा यांनी जबलपूरमधील नेताजी सुभाषचंद्र बोस कन्व्हेन्शन सेंटरमध्ये एका कार्यक्रमामध्ये हे वक्तव्य केलं.
“इस देश की सेना और सैनिक प्रधानमंत्री मोदी के चरणों में नतमस्तक हैं”
~ मध्यप्रदेश BJP के उपमुख्यमंत्री जगदीश देवड़ा
यह सेना के शौर्य पराक्रम का घोर अपमान है. माफ़ी से काम नहीं चलेगा
इस आदमी को तो आपको बर्खास्त करना ही पड़ेगा मोदी जी – घटिया, बेहद घटिया घिनौनी सोच है यह pic.twitter.com/j15xMzGB6s
— Supriya Shrinate (@SupriyaShrinate) May 16, 2025
काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी देवडा यांचा एक व्हिडिओ ट्विट केला. हा व्हिडिओ जबलपूरमधील आहे. देवडा जबलपूरमधील नागरी संरक्षण स्वयंसेवकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात बोलत होते. यावेळी पहलगाम हल्ल्याविषयी बोलताना ते म्हणाले, आमच्या मातांचं सिंदूर पुसण्याच काम ज्या लोकांनी केलं, ज्या दहशतवाद्यांनी केलं त्यांना आणि त्या दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांना संपवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. दहशतवाद्यांनी संपवत नाही, तोपर्यंत आम्ही शांततेचा श्वास घेणार नाही. आपण देशाच्या यशस्वी पंतप्रधानांचे आभार मानले पाहिजेत. आज संपूर्ण देश, देशाचे सैन्य, ते सैनिक सर्व मोदींच्या चरणी नतमस्तक आहेत. मोदींच्या धाडसाचे कौतूक करावे, तितक कमीच आहे, असं देवडा म्हणाले.
येणाऱ्या निवडणुका ‘मविआ’ सोबत लढवणार का?, उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर सपकाळांनी दिली ‘ही’ माहिती
‘देश की सेना और सैनिक प्रधानमंत्री मोदी के चरणों में नतमस्तक हैं’
• ये बात मध्य प्रदेश की BJP सरकार के उपमुख्यमंत्री जगदीश देवड़ा ने कही है।
जगदीश देवड़ा का यह बयान बेहद ही घटिया और शर्मनाक है।
ये सेना के शौर्य और पराक्रम का अपमान है। जब पूरा देश आज सेना के सामने नतमस्तक… pic.twitter.com/uQmrj40qnj
— Congress (@INCIndia) May 16, 2025
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवडा यांच्या या विधानावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. काही लोक त्यांच्या विधानाचे समर्थन करत आहेत, तर काही लोक त्यांच्यावर टीका करत आहे. कॉंग्रेसने जगदीश देवडा यांचे हे विधान खूपच घटिया आणि लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे. कॉंग्रेस ट्विट करत म्हटलं की, हा सैन्याच्या शौर्याचा आणि धाडसाचा अपमान आहे. आज संपूर्ण देश सैन्यासमोर नतमस्तक होत असताना, भाजप नेते आपल्या शूर सैन्याबद्दल त्यांचे हीन विचार प्रकट करत आहे. भाजपने आणि जगदीश देवडा यांनी माफी मागावी आणि त्यांची पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी कॉंग्रेसने केली.