बालवाङ्मय वाचायचं माझं वय नाही, ‘नरकातील स्वर्ग’ पुस्तकावरून CM फडणवीसांचा राऊतांना टोला

बालवाङ्मय वाचायचं माझं वय नाही, ‘नरकातील स्वर्ग’ पुस्तकावरून CM फडणवीसांचा राऊतांना टोला

Devendra Fadnavis On Sanjay Raut :  शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘नरकातील स्वर्ग’ आपल्या या पुस्कतकामध्ये देशातील आणि राज्यातील राजकारणातील अनेक धक्कादायक खुलासे केले आहे. या पुस्तकात खासदार राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) , केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत गौप्यस्फोट केले आहे.

नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना आणि अमित शाह गृहमंत्री असताना शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मदत केली होती असा दावा संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.  तर दुसरीकडे संजय राऊत यांच्या पुस्तकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत खासदार संजय राऊत यांना टोला लावला आहे.

माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, मी कादंबऱ्या वाचणे कधीचं सोडले आहे. कथा, कादंबऱ्या आणि बालवाड्मय वाचायचं माझं वय राहिलेलं नाही.  त्यामुळे असल्या गोष्टी मी वाचत नाही. असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना लावला आहे. तसेच संजय राऊत खूप मोठे नेते नाहीत, त्यांना सोडून द्या असं देखील माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

कोणाच्या नादी लागताय? खासदार मेधा कुलकर्णी यांना नाशिकमधून धमकीचे फोन

संजय राऊत यांचा दावा काय?

‘नरकातील स्वर्ग’ आपल्या पुस्तकात खासदार संजय राऊत यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तक्कालीन गृहराज्यमंत्री अमित शाह यांना शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मदत केली आणि यातील अनेक घटनांचा मी साक्षीदार आहे, यातील अनेक घटना मी माझ्या डोळ्यांनी पाहिल्या आहेत. असा दावा संजय राऊत यांनी ‘नरकातील स्वर्ग’ मध्ये केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube