Bajrang Punia : हरियाणाचे कुस्तीपटू बजरंग पुनिया (Bajrang Punia) यांनी काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केल्यानंतर त्यांना आता जीवे मारण्याची धमकी मिळाली. अनोळखी व्यक्तीने ही धमकी त्यांना व्हॉट्सॲप मेसेजवर दिली. यात पुनिया यांनी कॉंग्रेस सोडण्याची सोडावी, अन्यथा जीवे मारू, अशी धमकी देण्यात आली. व्हॉट्सॲपवर आलेल्या या मेसेजची तक्रार बजरंग पुनिया यांनी सोनीपत पोलिसांकडे (Sonepat Police) केलीय.
Swiggy मध्ये तब्बल 33 कोटींचा घोटाळा, माजी कर्मचाऱ्यावर आरोप
काँग्रेसने बजरंग पुनिया यांना अखिल भारतीय किसान काँग्रेसचे कार्याध्यक्ष बनवले. त्यानंतर पुनिया यांना जीवे मारण्याच्या धमकी आली. पुनिया यांना पाठवलेल्या व्हॉट्सॲप मेसेजमध्ये बजरंग यांनी काँग्रेस सोडावी, अन्यथा तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे भले होणार नाही, असे लिहिले आहे. हा आमचा शेवटचा संदेश आहे. निवडणुकीपूर्वी आम्ही काय आहोत ते दाखवून देऊ, अशी चेतावणी मेसेमध्ये दिली. एका परदेशी नंबरवरून व्हॉट्सॲपवर ही धमकी देण्यात आली.
घर फोडल्याचा एवढा पश्चाताप होत असेल तर…; जितेंद्र आव्हाडांचे अजितदादांना आव्हान
दरम्यान, बजरंग पुनिया यांनी सोनीपतमधील बहलगढ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत. पोलिसांनी सांगितले की, धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी आम्ही आवश्यक पावले उचलत आहेत. या धमकीनंतर बजरंग पुनिया यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात येणार असून सध्या त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला.
काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर राजकारणात मेहनत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुनिया म्हणाले की, आज आमचा उद्देश फक्त राजकारण करणे होता, असे बोलले जात आहे. आम्ही त्यांना (भाजप) पत्र पाठवले होते. आमच्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या वेळी काँग्रेस पक्ष आमच्या पाठीशी उभा राहिला. प्रत्येक वर्गासाठी आवाज उठवणारे आमचे नेते राहुल गांधी यांच्यासोबत आम्ही पूर्णपणे आहोत. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि खेळाडूही आहे. पक्षाने माझ्यावर जबाबदारी सोपवल्यानंतर मी शेतकऱ्यांचा आवाज अधिक चांगल्या पद्धतीने बुलंद करू शकेन, असं ते म्हणाले.