Swiggy मध्ये तब्बल 33 कोटींचा घोटाळा, माजी कर्मचाऱ्यावर आरोप
Swiggy Fraud Case : कमी वेळेत आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी स्विगी (Swiggy) आता एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे. माहितीनुसार, स्विगीने आपल्या एका माजी कर्मचाऱ्यावर तब्बल 33 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.
एका रिपोर्टनुसार, कंपनीच्या या ज्युनियर कर्मचाऱ्याने मागील वर्षी हा घोटाळा केला आहे. कंपनीच्या आर्थिक वर्ष 2024 च्या वार्षिक अहवालातून ही माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे येत्या काही दिवसात स्विगी आपला आयपीओ लाँच करणार आहे. त्यामुळे बाजारात अनेक चर्चांना उधाण आला आहे. स्विगीने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक बाह्य टीम नेमली आहे आणि याच बरोबर त्या ज्युनियर कर्मचाऱ्याविरोधात कायदेशीर तक्रार देखील दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षात स्विगी ग्रुपला एका उपकंपनीमध्ये अंदाजे 32.67 कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याची माहिती मिळाली आहे. ही रक्कम गेल्या वर्षी कंपनीच्या एका माजी ज्युनियर कर्मचाऱ्याने गंडा घातली होता अशी माहिती कंपनीने 4 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या वार्षिक अहवालात दिली आहे. तपासणीदरम्यान आढळलेल्या तथ्यांचा आढावा घेतल्यानंतर ग्रुपने 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात खर्च म्हणून वर नमूद केलेली रक्कम बुक केली आहे.
सावधान, देशात मंकीपॉक्सची एन्ट्री? संशयित रुग्णावर उपचार सुरु
लाँच होणार IPO
तर दुसरीकडे स्विगीने 26 एप्रिल रोजी त्यांच्या आयपीओसाठी कागदपत्रे देखील सादर केली आहे. या आयपीओद्वारे सुमारे 10,414 कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य स्विगीने ठेवले आहे. यातील 3,750 कोटी रुपये नवीन शेअर्स जारी करून उभे केले जाणार आहे तर 6,664 कोटी रुपयांची ऑफर-फॉर-सेल (OFS) असेल असणार आहे.
प्रेक्षकांचा होणार भरपूर मनोरंजन, 28 नोव्हेंबरला भेटीला येणार ‘बॅक टू स्कूल’