सावधान, देशात मंकीपॉक्सची एन्ट्री? संशयित रुग्णावर उपचार सुरु

  • Written By: Published:
सावधान, देशात मंकीपॉक्सची एन्ट्री? संशयित रुग्णावर उपचार सुरु

Monkeypox in India : देशात मंकीपॉक्सची (Monkeypox) एन्ट्री झाली असल्याची माहिती समोर आली आहे. एक मंकीपॉक्सचा संशयास्पद रुग्ण आढळून आल्याने सध्या एकच खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती देताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Health Ministry) सांगितले की, नुकताच मंकीपॉक्सने बाधित देशातून परतलेल्या एका व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाली असल्याचा संशय वर्तवण्यात येत आहे. सध्या या संशयित रुग्णावर उपचार सुरु करण्यात आला आहे. याच बरोबर संशयित रुग्णाचे नमुने तपासाठी घेतल्याची माहिती देखील आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, संशयित रुग्णाला मंकीपॉक्सची लागण झाली आहे का? याची तपासणी करण्यासाठी रुग्णाच्या नमुन्यांची चाचणी करण्यात येत आहे. प्रोटोकॉलनुसार सर्व तपासणी करण्यात येत असल्याची देखील माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील परिस्थिती नियंत्रणात 

तर दुसरीकडे सध्या देशाची परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती देखील आरोग्य विभागाने दिली आहे. तसेच मंकीपॉक्स सारख्या समस्यांना तोंड देण्यासाठी देश पूर्णपणे तयार आहे, कोणतेही संभाव्य धोके व्यवस्थापित करण्यासाठी आणि कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती देखील आरोग्य मंत्रालयाने दिली.

मंकीपॉक्स कसा पसरतो?

आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मंकीपॉक्सचा संसर्ग साधारणपणे 2-4 आठवडे असतो आणि रुग्ण सहसा सहाय्यक व्यवस्थापनाने बरा होऊ शकतो. संक्रमित व्यक्तीशी दीर्घकाळापर्यंत जवळचा संपर्क, लैंगिक संपर्काद्वारे, शरीराच्या किंवा जखमेच्या द्रवांशी थेट संपर्क किंवा संक्रमित व्यक्तीचे दूषित कपडे किंवा बेडशीट वापरल्याने मंकीपॉक्स होऊ शकते.

जबरदस्त! ‘या’ सरकारी योजनेत एकदाच गुंतवा पैसे अन् दरमहा करा कमाई

116 देशांतून मंकीपॉक्सची 99 हजारांहून अधिक प्रकरणे

WHO जुलै 2022 मध्ये WHO ने मंकीपॉक्सला PHEIC म्हणून घोषित करण्यात आले होते त्यानंतर मे 2023 मध्ये ते रद्द करण्यात आले. 2022 पर्यंत जागतिक स्तरावर WHO ने 116 देशांमध्ये मंकीपॉक्सची 99,176 प्रकरणे आणि 208 मृत्यूची नोंद केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube