सावधान! पाकिस्तानात सापडले ‘या’ घातक आजाराचे रुग्ण, अलर्ट जारी; भारतालाही टेन्शन
MPox Virus : एमपॉक्स आजाराने संक्रमित रुग्णांच्या (Mpox Virus) संख्येत सातत्याने वाढ होऊ लागली आहे. या घातक विषाणूचे रुग्ण भारताशेजारील पाकिस्तानात आढळून (Pakistan) आल्याने खळबळ उडाली आहे. पाकिस्तानात या आजाराचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. पाकिस्तानातील उत्तर खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या आरोग्य विभागाने सांगितले की पाकिस्तानात एमपॉक्स व्हायरसचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. संयुक्त अरब अमिरातीमधून (UAE) हे लोक पाकिस्तानात आले होते. त्यांची तपासणी केली असता एमपॉक्स ग्रस्त असल्याचे आढळून आले. आता भारताला देखील अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) या वायरसला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. पाकिस्तानात याआधी सुद्धा एमपॉक्स ज्याला मंकीपॉक्स देखील म्हटले जाते. या आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत.
Japan Mpox : टेन्शन वाढलं! जपानमध्ये ‘या’ घातक आजाराचा पहिला बळी; WHO अलर्ट
या रुग्णात नेमका कोणता व्हायरस आहे याची स्पष्ट माहिती अजून समोर आलेली नाही. आरोग्य विभागाचे महानिदेशख सलीम खान यांनी सांगितले की दोन रुग्णांमध्ये एनपॉक्स आढळून आला आहे. तिसऱ्या रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आता या तिन्ही रुग्णांना वेगळे ठेवण्यात आले आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रीय आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्त्याने सांगितले की एमपॉक्सचा एक संशयित रुग्ण आढळून आला आहे. याआधी स्वीडनमध्ये एमपॉक्सचा रुग्ण आढळून आला होता.
आफ्रिकेत हेल्थ इमर्जन्सी
आफ्रिकेतील सार्वजनिक आरोग्य संस्थेने मंगळवारी पब्लिक हेल्थ इमर्जन्सी घोषित केली आहे. हा विषाणू संसर्गजन्य आहे. एकमेकांच्या संपर्कात आल्याने या आजाराचा फैलाव होतो. या आजाराच्या रुग्णात फ्लू सारखी लक्षणे दिसतात. संक्रमित व्यक्तीच्या सरळ संपर्कात आल्याने हा आजार फैलावतो. बहुतांश प्रकरणे गंभीर नसतात मात्र काही प्रकरणांत जीवही जाऊ शकतो. या आजाराने पीडित रुग्णात तीव्र ताप, डोके दुखणे अशी लक्षणे दिसतात. त्यामुळे आरोग्य विभागाने आफ्रिकेत आवश्यक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.
Pakistan : सरकारी कार्यक्रमात ‘रेड कार्पेट’ बंद; खर्च कमी करण्यासाठी पाकिस्तानचा निर्णय
एमपॉक्स या आजाराला आधी मंकीपॉक्स या नावाने ओळखले जात होते. मागील वर्षातील नोव्हेंबर महिन्यात या आजाराचे नाव बदलून एमपॉक्स ठेवण्यात आले. मागील वर्षातील जुलै महिन्यात जपानमध्ये या आजाराचे संक्रमित रुग्ण सापडले होते. याच महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या आजाराला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली होती.
एमपॉक्स कसा फैलावतो ?
सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) नुसार, हा विषाणू संक्रमित प्राणी किंवा व्यक्तीच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या द्रवपदार्थांच्या संपर्कात आल्याने, संक्रमित प्राण्याचा चावा आणि स्पर्श या कारणांमुळे फैलावतो. उंदीर आणि माकडांच्या माध्यामातून हा विषाणू मोठ्या प्रमाणात पसरतो.
उपाय काय?
या आजारापासून संरक्षण करायचा असेल तर संक्रमित प्राणी तसेच आजारी आणि मृत प्राण्यांचा संपर्क टाळावा. तज्ज्ञांच्या मते मांसाहारी खाद्यपदार्थ चांगल्या पद्धतीने शिजून घ्यावेत.