प्रेक्षकांचे होणार भरपूर मनोरंजन, 28 नोव्हेंबरला भेटीला येणार ‘बॅक टू स्कूल’

  • Written By: Published:
प्रेक्षकांचे होणार भरपूर मनोरंजन, 28 नोव्हेंबरला भेटीला येणार ‘बॅक टू स्कूल’

Back To School : प्रत्येकाला शाळेच्या आठवणी फार प्रिय असतात आणि याच आठवणींना उजाळा देण्यासाठी लवकरच ‘बॅक टू स्कूल’ (Back To School) हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून 28 नोव्हेंबरला हा चित्रपट केवळ महाराष्ट्रात नव्हे तर गोवा, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि या सिंगापूरमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.

प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करण्यासाठी या चित्रपटामध्ये विपीन बोराटे, चंद्रकांत कुऱ्हाडे, सोमनाथ रसाळ, नितीन बनसोडे, अमृत झांबरे, अभिजित पटणे, रुपाली पाथरे, किरण झांबरे, सौरभ गोखले, निशिगंधा वाड, स्नेहा चव्हाण, सुरेश विश्वकर्मा, श्वेता पगार, आधिश पायगुडे, डॉ. परिणिता पावसकर, मोहिनी कुडेकर, श्वेता कामत, सुप्रिया मागाडे, यशा पाळणकर, भूमी दळी आणि ईशा आगरवाल आदी कलाकार दिसणार आहे.

तर विराज जाधव, प्रसाद कुलकर्णी, आयुष जगताप,तुषार गायकवाड,यश बिरे, रतनहरी फड, कैवल्य हरिश्चंद्रे, अजिंक्य गायकवाड ,जीवन भंडारी,आर्या घारे, विशाखा अडसूळ,हिमांगी टपळे, प्रगती पिंगळे, शर्वरी साठे,तन्वी गायकवाड,साक्षी शेळके,मौली बिसेन, नंदिनी पाटोळे आर्या कुटे, सार्थक उढाणे व समर्थ जाधव या बाल कलाकारांच्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. याच बरोबर बॅक टू स्कूलमध्ये सोनाली गव्हाणे, मनोज चौधरी, संदीप साकोरे, सुरेश डोळस, मीना गायकवाड,दत्ता उबाळे,सुवर्णा चोथे, सागर जाधव,एकता जाधव,वीणा वैद्य, अर्चना सातव, मिलिंद संगावार यांच्याही महत्वाच्या भूमिका असणार असल्याची माहिती चित्रपटाचे दिग्दर्शन सतिश महादु फुगे यांनी दिली आहे.

शाळा हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. तो वर्ग, घंटानाद, शिक्षक शाळेबाबतच्या या आणि अशा अनेक गोष्टी आपण कितीही मोठे झालो तरी विसरतो नाही. त्यामुळे आपल्या हृदयाच्या जवळच्या विषयावरील चित्रपटाची निर्मिती शुभांगी सतीश फुगे आणि सतिश महादु फुगे यांनी केली आहे. तर या चित्रपटाचे सहनिर्माता हनुमंत नाडेकर आहे आणि सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुदर्शन रणदिवे, अमित बेंद्रे, अमृता पाटील, प्राची फुगे, अमृत झांबरे, किरण झांबरे, दिपक गडदे, सुरेखा पवार यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.

जबरदस्त! ‘या’ सरकारी योजनेत एकदाच गुंतवा पैसे अन् दरमहा करा कमाई

बॅक टू स्कूल या चित्रपटाची पटकथा आणि संवाद अमित नंदकुमार बेंद्रे आणि सतीश महादू फुगे यांचे आहे तर फोटोग्राफीची धुरा श्रीनिवास गायकवाड यांनी सांभाळली आहे. बॅक टू स्कूल 28 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी फिल्मास्त्र स्टुडिओ, मुंबई यांनी घेतली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या