टीम इंडियाचा कारनामा! सामना टाय अन् एकाच वेळी पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडला पछाडले
IND vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यात आता (IND vs SL) एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू झाली आहे. पहिला सामना अनिर्णीत राहिला. या सामन्यात जिंकण्याची पूर्ण संधी भारताला होती. मात्र भारतीय फलंदाजांनी हाराकिरी केली त्याचा परिणाम टीम इंडियाला (Team India) अगदी सोपा सामनाही जिंकता आला नाही. या सामन्यात भारताला जिंकण्यासाठी 15 चेंडूत फक्त एक रन करण्याची आवश्यकता होती. पण शेवटचे दोन फलंदाज एकामागोमाग बाद झाले त्यामुळे जिंकत आलेला सामना टाय झाला. या सामन्यात श्रीलंकेने प्रथम (Sri Lanka) फलंदाजी करताना 50 ओव्हरमध्ये 230 धावा केल्या होत्या. भारतीय संघ मात्र 47.5 ओव्हर्समध्ये 230 धावांवर ऑल आऊट झाला.
पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया अन् इंग्लंडचे रेकॉर्ड तुटलं
श्रीलंके विरुद्धचा सामना टाय झाल्यानंतर सर्वाधिक (India vs Sri Lanka) टाय सामने खेळणाऱ्या संघांच्या यादीत भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाने आतापर्यंत दहा सामने टाय खेळले आहेत. तर पाकिस्तान(Pakistan), ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (England) या संघांनी प्रत्येकी 9-9 टाय सामने खेळले आहेत. आता भारताने या तिन्ही संघाना एकाच वेळी मागे टाकले आहे. या यादीत सर्वाधिक 11 टाय सामने खेळणारा वेस्टइंडीज (West Indies) संघ पहिल्या क्रमांकावर आहे.
IND vs SL : सूर्याला वनडेत डच्चू, रियानला दोन्ही संघात लॉटरी; संघ निवडीत ‘या’ खेळाडूंना संधी
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाच्या कामगिरीचा आढावा घेतला तर टीम इंडियाने आतापर्यंत 1056 सामने खेळले आहेत. यातील 559 सामन्यात विजय मिळाला आहे तर 443 सामन्यात पराभव झाला आहे. या दरम्यान भारताचे दहा सामने टाय झाले आहेत. या सामन्यात भारताच्या विजयाची टक्केवारी 52.93 टक्के अशी राहिली आहे.
सर्वाधिक टाय सामने खेळणार संघ
वेस्ट इंडीज 11
भारत 10
ऑस्ट्रेलिया 9
पाकिस्तान 9
इंग्लंड 9
झिम्बाब्वे 8
न्युझीलंड 7
Gautam Gambhir : दिग्गज असो की सिनियर, कुणालाच सोडलं नाही; क्रिकेट ‘हिस्ट्री’मधील गंभीरचे 5 मोठे वाद