Delhi Airport: दिल्ली विमानतळावर (Delhi Airport) आज सकाळी मोठी दुर्घटना टळली. विस्तारा एअरलाइन्सच्या (Vistara Airlines) एका विमानाला टेक ऑफ करण्याची परवानगी देण्यात आली तर दुसरे विमान लँडिंगच्या प्रक्रियेत होते. एटीसीच्या सूचनेनंतर उड्डाण रद्द करण्यात आले. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.
ANI नुसार, दिल्ली ते बागडोगरा हे फ्लाइट (Delhi to Bagdogra Flight)
UK725 नुकत्याच उद्घाटन झालेल्या नवीन धावपट्टीवरून उड्डाण करत होते. त्याचवेळी अहमदाबादहून दिल्लीला (Ahmedabad TO Delhi Flight) जाणारे विस्तारा हे विमान त्याच धावपट्टीच्या शेवटच्या दिशेने पुढे जात असताना लगतच्या धावपट्टीवर उतरले.
खामगावची चांदी पोहचली थेट चंद्रावर! ‘बीग बी’ अमिताभ बच्चन अन् सोनिया गांधींनाही घातलीय भुरळ
एटीसीच्या सतर्कतेमुळे अपघात टळला
“दोन्ही उड्डाणांना एकाच वेळी सहमती देण्यात आली पण एटीसीने ताबडतोब नियंत्रण मिळवले. कर्तव्यावर असलेल्या एटीसी (एअर ट्रॅफिक कंट्रोल) अधिकाऱ्याने विस्तारा यांना फ्लाइट रद्द करण्यास सांगितले,” असे एका अधिकाऱ्याने ANI ला सांगितले.
Censor Board Certificate: खिलाडीनंतर किंग खानच्या ‘जवान’ला कात्री?; सेन्सॉर बोर्डाने सुचवले बदल
Major mishap averted at Delhi airport; Vistara planes get permission for take off, landing at same time
Read @ANI Story | https://t.co/cWJTQjaD8l#DelhiAirport #IGIAirport #Vistara pic.twitter.com/M60GEIDK25
— ANI Digital (@ani_digital) August 23, 2023
उड्डाण रद्द झाल्यानंतर दिल्ली-बागडोगरा विमान ताबडतोब पार्किंग क्षेत्रात परतले. अधिकार्यांनी सांगितले की, विमानात इंधन भरण्यात आले जेणेकरून वैमानिकाला बागडोगरा येथे खराब हवामानाचा सामना करावा लागल्यास विमानात पुरेसे इंधन असेल. तसेच ब्रेकिंग सिस्टीमही तपासण्यात आली.