Download App

आपची दुसरी यादी जाहीर, सिसोदिया जंगपुरामधून लढणार, अवध ओझा यांनाही उमेदवारी

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने (आप) सोमवारी 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली.

  • Written By: Last Updated:

Delhi Election AAP Candidate List 2025 : दिल्लीत पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा (Delhi Vidhansabha Election) निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने तयारी सुरू केलीये. या पार्श्वभूमीवर पक्षाने सोमवारी 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) जंगपुरामधून निवडणूक लढवणार आहेत. तर पटपडगंजमधून अवध ओझा (Awadh Ojha) यांना आम आदमी पार्टीने उमेदवारी दिली.

भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं भर चौकात अपहरण… 

विशेष म्हणजे, मनीष सिसोदिया यांनी यावेळी आपला मतदारसंघ बदलला आहे. सिसोदिया ज्या मतदारसंघातून निवडून आले होते, त्या मतदारसंघातून ओझा यांना उमेदवारी जाहीर झाली. ओझा पटपडगंजमधून तर सिसोदिया यांना जंगपुरा इथून उमेदवारी देण्यात आली. अलीकडेच अवध ओझा यांनी आपमध्ये प्रवेश केला होता. ते निवडणूक लढवणार की नाही, अशी चर्चा सुरू होती. पण आता ते पटपडगंज मतदारसंघातून निवडणूक लढवणार हे निश्चित झालंय.

लोकसभेत ईव्हीएम कसं वाटायचं?, गारगार वाटायचं; नार्वेकरांचं अभिनंदन, अजित पवारांची टोलेबाजी 

प्रसिद्ध चेहऱ्यांपैकी ‘आप’ने तिमारपूरचे विद्यमान आमदार दिलीप पांडे यांचे तिकीट रद्द केले आहे. त्यांच्या जागी दोन दिवसांपूर्वी भाजपमधून ‘आप’मध्ये दाखल झालेले सुरेंद्र पाल सिंह बिट्टू यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

याशिवाय आपने नरेलामधून दिनेश भारद्वाज, आदर्श नगरमधून मुकेश गोयल, मुंडकामधून जसबीर कारला, मंगोलपुरीतून राकेश जाटव आणि चांदनी चौकातून पुनरदीप सिंह साहनी यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

परवेश रतन आणि जितेंद्र सिंह शंटी हे भाजप सोडून ‘आप’मध्ये आल्यानंतर पक्षाने त्यांनाही उमेदवारीही दिली आहे. प्रवेश रतन यांना पटेल नगरमधून तर जितेंद्र सिंह यांना शाहदरातून उमेदवारी देण्यात आली आहे.

‘आप’च्या उमेदवारांची दुसरी यादी
1. नरेला- दिनेश भारद्वाज
2. तिमारपूर- सुरेंद्र पाल सिंह बिट्टू
3. आदर्श नगर-मुकेश गोयल
4.मुंडका- जसबीर कारला
5. मंगोलपुरी- राकेश जाटव
6. रोहिणी- प्रदीप मित्तल
7. चांदनी चौक- पुनरदीप सिंग साहनी
8. पटेल नगर- प्रवेश रतन
9. मादीपूर- राखी बिडलान
10. जनकपुरी- प्रवीण कुमार
11. बिजवासन- सुरेंद्र भारद्वाज
12. पालम- जोगिंदर सोलंकी
13. जंगपुरा- मनीष सिसोदिया
14. देवली- प्रेमकुमार चौहान
15. त्रिलोकपुरी- अंजना पारचा
16. पटपडगंज- अवध ओझा
17. कृष्णा नगर- विकास बग्गा
18. गांधी नगर – नवीन चौधरी (दीपू)
19. शाहदरा- पद्मश्री जितेंद्र सिंह शंटी
20. मुस्तफाबाद- आदिल अहमद खान

दरम्यान, ‘आप’ची पहिली यादी 21 नोव्हेंबरला आली होती, त्यात 11 उमेदवारांची नावे होती. पक्षाने आतापर्यंत 31 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत.

 

 

follow us